अवकाळी पावसाने शेतीचे १६ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:36+5:302021-02-23T04:17:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतीचे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील चार तालुक्यातील शेतीचे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आंब्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून मोहोर तसेच लहान कैरीही गळून पडली आहे.
७५ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून ३१७ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांचे १० लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आंब्याचे नुकसान झालेले क्षेत्र ३३ हेक्टर असून १३० शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांचे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
जिल्हा कृषी विभाग, महसूल यांच्या वतीने झालेल्या पाहणीवरून हा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी ही माहिती दिली. जुन्नर, खेड, भोर, हवेली या चार तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान केले आहे. महसूल विभागाच्या वतीने आता याचे अधिकृत पंचनामे करून नंतर नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार होईल.
खेड व हवेली तालुक्यात आंब्याला चांगला मोहोर आला होता. काही ठिकाणी लहान फळ लागले होते. पावसाने मोहेरही गळून गेला व फळेही झाडापासून तुटून खाली पडली.