भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने ही मोहीम राबविली जात आहे. बहिरवाडी हे गाव दुर्गम भागात असून ६०० लोकसंख्या असलेल्या गावात बहुसंख्य लोक अनुसूचित जाती-जमातीचे आहेत. लसीकरण केंद्र या गावाजवळ नाही याचा विचार करून या गावाची निवड करण्यात आल्याची माहिती ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांनी दिली आहे. ग्रामीण संस्थेच्या वतीने कोरोनाचे पहिल्या लाटेच्या वेळी दररोज दोन हजार लोकांना मोफत आनंदी थाळीचे वितरण केले, दररोज ५ हजार लिटर्स दूध वाटप नऊ हजार कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा किराणा दिला. आमदार संजय जगताप याच्या आवाहनास प्रतिसाद देत २५०० बॅग रक्त संकलित केले. दुसऱ्या लाटेच्या वेळी पुरंदरमधील खळद येथे आनंदी कोविड सेंटर सुरू केले त्याच बरोबर देवाची उरली येथेही सेंटर सुरू करून मोफत औषोधोपचार केले आहेत. आता मोफत लस देण्याचा उपक्रम सुरू केला आहे असेही जगताप यांनी सांगितले.
बहिरवाडी येथील नागरिकांचे ग्रामीण संस्थेमार्फत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:09 AM