राज्यभरात आज सोमवारी दिव्यांगांना कोरोना प्रतिबंधित लसीकरण करण्यात येत आहे. नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी अकराच्या सुमारास पुरंदरचे माजी उपसभापती गोरखनाथ माने यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना लसीकरण करून सुरुवात करण्यात आली. लसीकरणास आलेल्या दिव्यांगांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
नीरेतील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गुळुंचे, कर्नलवाडी, पिंपरे (खुर्द), थोपटेवाडी व मांडकी येथील वय वर्षे ४४ च्या पुढच्या सर्व दिव्यांग महिला व पुरुषांना लसीकरण करण्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आली होती. प्रत्येक गावच्या आरोग्यसेविका. आशासेविका. अंगणवाडीसेविकांनी दिव्यांगांना घरोघरी जाऊन लसीकरणास जाण्याची विनंती करत रुग्णवाहिकेत बसवून दिले.
नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिव्यांगांच्या लसीकरणाच्या शुभारंभावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामसेवक मनोज डेरे, नीरा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष अजय राऊत, युवक कार्याध्यक्ष महेश धायगुडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे समन्वयक मंगेश ढमाळ, अनिल मेमाणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अक्षय म्हवाण, आरोग्यसेवक शिवाजी चव्हाण, शुभांगी चव्हाण, सुनीता गोवेकर आदी उपस्थित होते.