डिंभे आरोग्य केंद्रात हजार नागरिकांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:19 AM2021-03-13T04:19:49+5:302021-03-13T04:19:49+5:30
शासनाच्या मार्गदर्शनाखाली सध्या सर्वत्र कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचारी यांचे लसीकरण झाल्यावर ...
शासनाच्या मार्गदर्शनाखाली सध्या सर्वत्र कोविड लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन
कर्मचारी यांचे लसीकरण झाल्यावर आता ६० वर्षांपुढील जेष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वर्षे या मधील नागरिकांना शासनामार्फत मोफत लस देण्यात येत आहे. सदर लसीकरण प्रा आ. केंद्र डिंभे येथे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरू असून लाभार्थींनी नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
डिंभे आरोग्य केंद्रात आरोग्य या लसीकरणासाठी स्वतंत्र विभाग सुरु केला असून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत लसीकरण सुरु आहे. आरोग्य सहायक दीपक गाडीलकर आणि आरोग्य सहायिका अलका खोसे आणि सर्व आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांचे नोंदणी करण्यापासून लस घेईपर्यंत सहकार्य करत आहेत.
--
चौदा कर्मचारी १०२० डोस
डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्राची एकूण लोकसंख्या २०८४० असून, ६० वर्षांवरील ४२८३ लाभार्थी आहेत. आजपर्यंत १०२० डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरण केंद्रावर २ शिक्षक, ऑनलाईन नोंदणीसाठी ४ कर्मचारी, व्हेक्सीलेटरसाठी ४, व निरीक्षण कक्षमध्ये ४ आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत.
---
डिंभे आरोग्य केंद्राअंतर्गत १५ फेब्रुवारी पासून कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. लसीकरणानंतर काहींना अंग, डोकेदुखी, ताप असा त्रास जाणवत आहे. मात्र १ ते २ दिवसात हा त्रास आपोआप थांबत आहे. जास्तीत नागरिकांनी नोंदणी करून शासनाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे,
-डॉ. तुषार पवार, आरोग्य आधिकारी डिंभे प्रा. आ. केंद्र.)
-------
फोटो क्रमांक - १२ डिंभे लसीकरण
फोटो ओळी : डिंभे (ता. आंबेगाव) येथील प्रा. आ. केंद्रात कोविड लसीकरणास सुरुवात झाल्यापासून लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे.