Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : वडगावशेरीत सुनील टिंगरे आघाडीवर, दुसऱ्या फेरीनंतर २४६२ मतांचे लीड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:00 AM2024-11-23T10:00:21+5:302024-11-23T10:13:05+5:30
Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : वडगावशेरीत सुनील टिंगरे आघाडीवर, दुसऱ्या फेरीनंतर २४६२ मतांचे लीड
Vadgaonsheri vidhan sabha assembly election result 2024 : पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये थेट सामना पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि शरद पवार गटाचे बाप्पूसाहेब पठारे यांच्यातील लढतीने मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले होते.
इथे क्लिक करा >महाराष्ट्र विधानसभा निकाल २ ० २ ४
आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सुनील टिंगरे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. पहिल्या फेरीत टिंगरे यांनी ८०१ मतांची आघाडी घेतली, तर दुसऱ्या फेरीत ती वाढवत २४६२ मतांवर नेली आहे. आतापर्यंतच्या एकूण मतमोजणीनुसार, सुनील टिंगरे यांना १३,१२४ मते मिळाली असून बाप्पूसाहेब पठारे यांना १०,८२२ मते मिळाली आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यंदा पक्षामध्ये उभी फूट पडल्याने त्यांना कठीण आव्हानाचा सामना करावा लागत आहे. अशातच पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये लीड घेतल्याने टिंगरे यांच्या आघाडीने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे.
वडगावशेरी मतदारसंघ हा पुण्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. येथे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत लागल्याने चुरस अधिकच वाढली आहे.
सध्या मतमोजणी प्रक्रियेचा वेग वाढला असून लवकरच पुढील फेऱ्यांचे निकाल हाती येतील. वडगावशेरीचा गड कोण जिंकतो, हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.