समृद्ध जीवनची मालमत्ता खेरदी-विक्री : वैशाली मोतेवार घ्यायच्या निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:51 AM2018-07-10T02:51:03+5:302018-07-10T02:51:14+5:30
समृद्ध जीवन समूहातील मालमत्ता खेरदी-विक्रीचे निर्णय कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवार घेत. कंपीनीच्या आत्तापर्यंत ३६५ मालमत्ता तपासात निष्पन्न झाल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी वैशाली यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद सोमवारी सरकारी पक्षाने केला.
पुणे - समृद्ध जीवन समूहातील मालमत्ता खेरदी-विक्रीचे निर्णय कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवार घेत. कंपीनीच्या आत्तापर्यंत ३६५ मालमत्ता तपासात निष्पन्न झाल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी वैशाली यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद सोमवारी सरकारी पक्षाने केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या वैशाली महेश मोतेवार (वय ४३, रा. पाटीलनगर, धनकवडी) यांच्या पोलीस कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.
वैशाली यांना न्यायालयाने २०१६मध्ये फरारही घोषित केले होते. कंपनीच्या मिळालेल्या अहवालानुसार वैशाली यांना पगार स्वरूपात १ कोटी १० लाख रुपयेदेखील मिळाले आहेत. महेश मोतेवार यांनी मुलगा अभिषेक याला पॉवर आॅफ अॅटर्नीचे अधिकार दिले असून, आतापर्यंत किती मालमत्तांची विल्हेवाट लावली, याचा तपास करायचा आहे. इलेगन्स इंटरटेन्मेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सुमारे ५ कोटी ते १५ कोटी रुपये किंमत असलेली म्युझिक सिस्टीम विक्री केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
संचालक म्हणून कार्यरत असल्यामुळे अपहार केलेल्या पैशांबाबत वैशाली यांच्याकडे तपास करायचा आहे. फरार कालावधीत त्यांनी मालमत्ताविक्रीचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी वैशाली यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
समृद्ध जीवन कंपनीच्या आॅक्टोबर २००९पासून वैशाली या संचालक होत्या. २०१३मध्ये कंपनीच्या त्या दुसºया क्रमांकाच्या शेअरधारक आहेत. त्यांच्या नावावर १७ हजार शेअर असून, हा वाटा एकूण १७.८९ टक्के आहे. व्यवहाराबाबत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. कंपनीने ३ हजार ५०० कोटींहून अधिकची फसवणूक केली आहे