तालुक्यातील एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीची पहिली आढावा बैठक तहसीलदार विजय पाटील यांच्या उपस्थित पार पडली. या वेळी अध्यक्ष होळकर बोलत होते. होळकर पुढे म्हणाले, यापुढेही बैठकीच्या माध्यमातून वेळोवेळी बारामती तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यात येईल, तसेच सर्व विभागांनी आणि सदस्यांनी समन्वय ठेवून कामे चांगल्या दर्जाची करावीत.
या वेळी तहसीलदार पाटील यांनी एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे कार्यक्षेत्र, उद्दिष्टे व कामांची माहिती सर्व उपस्थितांना दिली. सर्व संबंधित अधिकारी व प्रतिनिधी यांनी पुढील बैठकीस येण्यापूर्वी आठ दिवस अगोदर तयारी करावी व सर्व माहितीसह बैठकीला उपस्थित राहावे, अशा सूचना दिल्या.
बैठकीसाठी पंचायत समिती सभापती नीता फरांदे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका कृषी अधिकारी दतात्रय पडवळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव, एकात्मिक समितीचे सदस्य सुशांत जगताप, मंगेश खताळ, रमेश इंगुले, वनीता बनकर, अनिता गायकवाड, बाबासाहेब परकाळे, शिवाजीराव टेंगळे, निखिल देवकाते आदी उपस्थित होते.