वाघोलीच्या सरपंचपदी वसुंधरा उबाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 01:08 AM2017-12-28T01:08:35+5:302017-12-28T01:09:28+5:30

वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या सर्वाधिक चर्चेत असणा-या मीनाकाकी सातव यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले.

Vasundhara Ubale, the sarpanch of Wagholi | वाघोलीच्या सरपंचपदी वसुंधरा उबाळे

वाघोलीच्या सरपंचपदी वसुंधरा उबाळे

Next

वाघोली : वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या सर्वाधिक चर्चेत असणा-या मीनाकाकी सातव यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. माजी सभापती व वाघेश्वर पॅनलच्या वसुंधरा उबाळे यांनी दिलेल्या चुरशीच्या लढतीमध्ये अवघ्या ५० मतांनी उबाळे विजयी झाल्या आहेत. पहिल्या ३ वॉर्डांमध्ये वसुंधरा उबाळे या आघाडीवर होत्या. मात्र, स्वत: त्यांनी सर्वच वार्डांमध्ये आघाडी घेतली, तरीही ५० मतांच्या फरकाने आघाडीवर होत्या.
ग्रामविकास पॅनलने मतमोजणीवर आक्षेप घेऊन फेरमतमोजणीची मागणी केली होती. फेरमतमोजणीमध्ये वसुंधरा उबाळेच आघाडीवर राहिल्या. वाघेश्वर पॅनलचा सरपंच निवडून आला असला, तरी १७ सदस्यांपैकी वाघेश्वर पॅनलचे ७ सदस्य निवडून आले आहेत, तर ग्रामविकास पॅनलच्या १७ सदस्यांपैकी ९ सदस्य निवडून आले आहेत, तर वॉर्ड क्र. ४ मध्ये अनुसूचित जाती जागेवर निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार श्रीकांत वाघमारे निवडून आले आहेत.
पुणे येथील शिवाजीनगर शासकीय गोदामामध्ये सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. प्रथम फेरीमध्ये वॉर्ड क्र. १, २ व ३ यांची मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर वॉर्ड क्र. ४, ५ व ६ या वॉर्डांची मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या मतमोजणीत उबाळे याच आघाडीवर राहिल्या. दोन्ही फेºयांच्या एकूण मतमोजणीत वसुंधरा उबाळे यांना ८,७६६, मीनाकाकी सातव यांना ८,७१६, साधना व्यवहारे यांना ३३६ व नोटाला १६० मते पडली. उबाळे ५० मतांनी विजयी झाल्या.
सदस्यपदासाठी झालेल्या मतमोजणीमध्ये वाघेश्वर पॅनलचे वॉर्ड क्र. १ मधील उमेदवार महेंद्र भाडळे २,५६७, पूजा भाडळे २,९००, शिवदास उबाळे २,५०३, वॉर्ड क्र. २ मधील विजय भाडळे १,३१६, वंदना दाभाडे १,३८१, ग्रामविकास पॅनलचे वॉर्ड क्र. ३चे रामकृष्ण सातव २,०२६, रोहिणी गोरे २,२१४, रेश्मा पाचारणे २,०९२, वार्ड क्र. ४ सुनीता सातव १,६४३, कविता दळवी १,५३०, श्रीकांत वाघमारे १,१८९, वॉर्ड क्र. ५ मधील अर्चना कटके १,३५०, जयप्रकाश सातव १,१८५ हे विजयी झाले. वॉर्ड क्र. ५ मधील मारुती गाडे १,४४८, वॉर्ड क्र. ६ मधील संदीप सातव २,१६०, मालती गोगावले २,२७३, जयश्री काळे १,९८१ या विजयी झाल्या. काळभैरवनाथ पॅनलला एकाही जागेवर यश मिळाले नाही.
>निकालाआधीच फ्लेक्स
अति उत्साही होऊन वाघोली ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार मीनाकाकी सातव यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल लागायच्या अगोदरच सकाळी ६ वाजता वाघोलीमध्ये मोठमोठाले सरपंचपदाचे फ्लेक्स लावण्यात आले. त्यामुळे वाघोलीतील ग्रामस्थामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मतमोजणीच्या ठिकाणीच ५० मतांनी विजयी झाल्याचे कळताक्षणी वसुंधरा उबाळे यांना आंनदाश्रू अनावर झाले.

Web Title: Vasundhara Ubale, the sarpanch of Wagholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.