पुणे -नाशिक महामार्गालगत भाजी विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:18+5:302020-12-08T04:10:18+5:30
राजगुरुनगर: पुणे -नाशिक महामार्गालगत पानमळा (ता खेड ) येथे भाजीपाला विक्रेते बसत असल्याने खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे ...
राजगुरुनगर: पुणे -नाशिक महामार्गालगत पानमळा (ता खेड ) येथे भाजीपाला विक्रेते बसत असल्याने खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे महामार्गावर वाहतूकीस अडथळा होत आहे. पण त्यापेक्षाही अपघाताची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या भाजी विक्रेत्यांना इतरत्र व्यवसायासाठी जागा देऊन यावर तोडगा काढावा अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
पुणे- नाशिक बाहय वळण रस्ता पुर्णत्वाच्चा मार्गावर आहे. तसेच जुना मार्गही सुरु आहे. हा बाह्यवळण रस्ता पानमळा येथे येऊन मिळतो. त्या ठिकाणी या परिसरातील शेतकरी, व भाजीविक्रेते महामार्गालगतच भाजी विक्रीसाठी बसतात. ताजा हिरवा भाजीपाला असल्याने या ठिकाणी चारचाकी वाहनचालक, दुचाकीस्वार महामार्गावर वाहने उभी करून भाजी खरेदीसाठी उतरत असतात. रस्त्यावर वाहने उभी असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहणांना अडथळा निर्माण होतो.रस्त्यांचे काम सुरू असत्याने खेड बाह्यवळण रस्त्यांचा फाटा याच ठिकाणी असल्याने तसेच या ठिकाणी वाहने उभी केलेली असतात. भाजी विक्रेते बसल्यामुळे नवीन येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडतो. रोज सांयकाळी या ठिकाणी वाहतुक कोंडी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. याकडे स्थानिक वाहतुक पोलीस व महामार्ग सुरक्षा पोलीस यांचे दुर्लक्ष झाले आहे. या भाजीविक्रेत्यांनी काळजी घेऊन भाजी विक्री करावी मात्र जेणेकरून वाहतुककोंडी व एखादा अपघात होणार नाही यांची काळजी घेणे गरजेचे आहे..
फोटो
०७ राजगुरुनगर बाजार
पानमळा येथे भाजी खरेदीसाठी वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याने झालेली वाहतूककोंडी.