भोर तालुक्यात पहिल्याच दिवशी ३० शाळांवर शिक्षक गैरहजर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:48 PM2018-06-16T18:48:35+5:302018-06-16T18:48:35+5:30

गेल्या महिन्यात भोर तालुक्यातील ४१४ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे ३० शाळा शिक्षकांविना आहेत.

On the very first day in Bhor taluka, teachers were absent in 30 schools | भोर तालुक्यात पहिल्याच दिवशी ३० शाळांवर शिक्षक गैरहजर 

भोर तालुक्यात पहिल्याच दिवशी ३० शाळांवर शिक्षक गैरहजर 

Next
ठळक मुद्देशिक्षक हजर न झाल्यास शाळांना टाळे ठोकण्याचा इशारा सुगम व दुर्गम यानुसार तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या तालुक्यात आणि तालुक्याबाहेर आॅनलाईन बदल्या

भोर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तालुक्याबाहेर आॅनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर बाहेरील तालुक्यातील शिक्षक हजर न झाल्यामुळे दुर्गम डोंगरी भागातील ३० शाळा शिक्षकांविना आहेत. तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्या शाळेवरील शिक्षक पाठवून शाळा सुरू ठेवल्या, नाही तर शाळा बंद राहिल्या असत्या. दुर्गम डोंगरी भागावर नेहमीच शिक्षकांची ही ओरड असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षक हजर न झाल्यास शाळांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या महिन्यात भोर तालुक्यातील ४१४ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. त्यातील १८७ शिक्षकांच्या बदल्या तालुक्याबाहेर झाल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त केले. मात्र त्यांच्या जागेवर बाहेरील तालुक्यातून अद्याप शिक्षक हजर झाले नाहीत.
त्यामुळे तालुक्यातील ३० शाळा शिक्षकांविना राहिल्या आहेत. या शाळा बंद राहू नयेत, म्हणून शिक्षण विभागाने तात्पुरत्या स्वरुपात इतर केंद्रांतील शिक्षकांना शाळेवर पाठवले. मात्र शिक्षक नसल्याने नीरादेवघर व भाटघर धरण भागातील शिरगाव भुतोंडे, हिर्डोशी, साळव, आंबाडे, बारे बु, आपटी या केंद्रांतील शिरवली हि. मा, अद्यनखानवाडी, करंजगाव, पºहर बुद्रुक, धानवली (केशवनगर), रायरी (माळवाडी), कुडली बुद्रुक, कारुंगण, कुडली खुर्द, निवंगण, गुढे, हिर्डोशी, अशिंपी, दुर्गाडी (मानटवस्ती), राजीवडी, पसुरे (टोंगवाडी, धनगरवस्ती), मळे (मिरकुटवाडी, महादेवववाडी), नांदघुर (बुरुडमाळ) साळुंगण, पांगारी, वाघमाची बोपे, भुतोंडे, चांदवणे, भांड्रवली, गृहिणी या शाळांचा समावेश आहे. 
........................
पाहिजे त्याठिकाणी बदली मिळाल्याने ‘शिक्षक तुपाशी आणि विद्यार्थी उपाशी’ अशी अवस्था झाली आहे. सुगम व दुर्गम यानुसार तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या तालुक्यात आणि तालुक्याबाहेर आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांत शिक्षकांना लाभ झाला असला तरी दुर्गम डोंगरी भागातील सोयीसुविधा नसलेल्या गावात नीरादेवघर व भाटघर धरण खोऱ्यातील अडचणींच्या गावात मात्र प्राथमिक शिक्षकच हजर झाले नाहीत. त्यामुळे ३० शाळा शिक्षकांविना आहेत. भविष्यात शिक्षक हजर झाले नाहीत तर शाळाच बंद राहणार आहेत.
पाहिजे त्या गावात बदली मिळाल्याने ‘शिक्षक तुपाशी तर विद्यार्थी उपाशी’ अशी अवस्था झाली आहे. भोर तालुक्यातील प्राथमिक शाळांची अवस्था  झाली आहे. त्यामुळे पालक नाराज झाले असून सोमवारी शिक्षक हजर झाले नाही, तर शाळा बंद करण्याचा इशारा माजी उपसभापती भगवान कंक यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेकडून नवीन शिक्षक दाखल होत असून सोमवारी सर्व शिक्षक शाळांवर हजर होतील, असे भोरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक गोडसे यांनी सांगितले.             

Web Title: On the very first day in Bhor taluka, teachers were absent in 30 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.