व्हिडीओ : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाेटला भीमसागर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 03:54 PM2019-04-14T15:54:52+5:302019-04-14T15:56:54+5:30
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहर व जिल्ह्यातून शहर आणि जिल्ह्यातून हजाराे अनुयायी आले हाेते.
पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डाॅ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शहर व जिल्ह्यातून शहर आणि जिल्ह्यातून हजाराे अनुयायी आले हाेते. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलित करुन आंबेडकरांच्या विचारांना नमन करण्यात आले. काल रात्री पासूनच आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी येण्यास सुरुवात केली हाेती.
राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव अशा विविध उपाधी असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी आंबेडकर अनुयायी गर्दी करत असतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण पुण्यातील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी विविध जलशांच्या कार्यक्रमांचे देखील आयाेजन करण्यात येते. त्याचबराेबर आलेल्या नागरिकांची गैरसाेय हाेऊ नये यासाठी प्रशासनाकडून देखील व्यवस्था केली जाते. यंदा देखील पांढरे वस्त्र परिधान करुन हजाराे आंबेडकर अनुयायांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली.
शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा संदेश आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना दिला हाेता. हाच संदेश लक्षात ठेवत आंबेडकर अनुयायी आंबेडकर जयंती असाे की महापरिनिर्वाण दिन असाे. विविध सामाजिक विषयांवरील तसेच आंबेडकरांवरील पुस्तके आवर्जुन विकत घेत असतात. आजही आंबेडकर पुतळ्याजवळ अनेक पुस्तकांचे स्टाॅल लावण्यात आले हाेते. या ठिकाणी ज्येष्ठांबराेबरच तरुणांची देखील हजेरी दिसून आली. त्याचबराेबर विविध सामाजिक संस्थांकडून जेवणाची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती. प्रशासनाकडून देखील चाेख बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. त्याचबराेबर अग्निशमन दलाची गाडी देखील तैनात करण्यात आली हाेती. रणरणत्या उन्हात देखील हजाराे लाेक आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकर पुतळ्याजवळ येत हाेते.