VIDEO : रिक्षा माझी भारी, तिचीच केली फेरारी
By Admin | Published: November 18, 2016 05:15 PM2016-11-18T17:15:34+5:302016-11-18T17:15:34+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 18 - मर्सिडिझ, ऑडी, फेरारी अशा मोठमोठ्या गाड्याही जिच्या समोर फिक्या पडतील अशी देखणी ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - मर्सिडिझ, ऑडी, फेरारी अशा मोठमोठ्या गाड्याही जिच्या समोर फिक्या पडतील अशी देखणी रिक्षा पुण्यातील कोथरुड परिसरातील किसनराव मारणे यांनी तयार केली आहे. लाल रंगाची व्हिंटेज लूक असलेली मारणे काकांची रिक्षा सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मारणे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत होते. त्यानंतर स्कूल बसचा व्यवसाय सुरु केला. आयुष्यात स्थैर्य आले. मात्र जिच्या सोबत त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ व्यथित केला, जिच्यामुळे व्यवसाय वृद्धींगत झाला, अशी जिवाची रिक्षा कायम सोबत असावी अशी त्यांची इच्छा होती.
त्यामुळे मोटार घेण्याची ऐपत असूनही त्यांनी आपली ही रिक्षाच वेगळ्या प्रकारे तयार करुन घ्यायचे ठरवले. त्यांच्या या कल्पनेला सत्यात उतरवण्याचं काम कात्रज येथील सेंट्रल ऑटोचे कारागीर सईदभाई दलाल यांनी केले. गेल्या दोन ते तीन वर्षापासून ते या रिक्षावर काम करतायेत. एखाद्या व्हिंटेज लूक असलेल्य फेरारी सारखी ती दिसत आहे. अजूनही काम सुरू असून छत उघडण्यासारखा दरवाजापासून अनेक सुविधा करण्याचे काम सुरू आहे.
‘लोकमत’शी बोलताना मारणे म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे दिवसातील वीस तास मी रिक्षा चालवायचो. माझे संपूर्ण आयुष्यच रिक्षात गेलं. रिक्षाचा व्यवसाय बंद करताना रिक्षा आपल्या कायम सोबत असावी म्हणून खाजगी वापरासाठी मी रिक्षा सजवण्याचे ठरवले. माझी ही रिक्षा कुठल्याही कारपेक्षा माझ्यासाठी कमी नाही.
२०१२ साली झालेल्या राज्यस्तरीय 'रिक्षा फॅशन शो'मध्ये त्यांनी सजवलेल्या रिक्षाला प्रथम क्रमांक मिळवला होता. पहिल्यापासूनच आपल्या रिक्षावर जीवापाड प्रेम करणारे मारणे आपल्या नातवंडांना या रिक्षातून सैर घडवतात. ते जेथे जातात तेथे लोक या रिक्षासोबत फोटो काढतात.
https://www.dailymotion.com/video/x844ikd