VIDEO : शालेय तासिका कपातीविरोधात शिक्षकांचे आंदोलन
By Admin | Published: June 14, 2017 07:53 PM2017-06-14T19:53:39+5:302017-06-14T20:48:00+5:30
ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 14 - महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण,कला व संगीत विषय बचाव कृती समितीने व सर्व शिक्षकांनी ...
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण,कला व संगीत विषय बचाव कृती समितीने व सर्व शिक्षकांनी या तासिका कपाती विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलन केले आहे. हे आंदोलन कुमठेकर रोडवरील विद्या प्राधिकरण येथे करण्यात आले आहे.
पुणे, दि. 14 - महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण,कला व संगीत विषय बचाव कृती समितीने व सर्व शिक्षकांनी या तासिका कपाती विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलन केले आहे. हे आंदोलन कुमठेकर रोडवरील विद्या प्राधिकरण येथे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने शारीरिक शिक्षण,कला आणि संगीत या विषयाच्या तासिका कमी केल्यामुळे समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते पण काही प्रतिसाद न आल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी समितीचे अध्यक्ष अरुण खोडस्कर, कार्याध्यक्ष विनोद इंगोले, उपाध्यक्ष राजेंद्र कोतकर, सचिव शिवदत्त ढवळे, हरिभाऊ खंडारे, प्रल्हाद शिंदे, संतोष अरोरा, नीरज देशमुख, गणेश भुतडा, माधव रेखे आणि समिती सदस्य व शिक्षक उपस्थित होते.
राजेंद्र कोतकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाने तासिकेत ५०टक्के कपात करून जो निर्णय घेतला आहे तो फार चुकीचा आहे. आमच्या शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडते अनेक कलाकार आम्ही घडवतो आणि आमच्या तासिका कमी करून शासनाला काय फायदा होणार आहे. या तासिका जर पूर्वरत झाल्या नाहीत तर क्रीडा क्षेत्र तसेच कला क्षेत्रावर बहिष्कार टाकू कुठल्याही कलाकार व खेळाडूला पुढे येऊन देणार नाही.
विनय इंगोले म्हणाले, हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. राज्य शासनाने कोणत्याही विषयाला कोणता विषय ना जोडता हा निर्णय घेतला आहे. या नियमबाह्य आणि स्वमजीर्ने आपला पैसा वाचविण्यासाठी घेतलेल्या या अन्यायाविरुद्ध आम्ही सर्व शिक्षक बाहेर येऊ.
https://www.dailymotion.com/video/x84csgq