श्री विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करून भजन झाले नंतर आर्थिक क्रांती अभियानचे संस्थापक कामगार नेते सतीश शिंदे यांचे व्याख्यान झाले. महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कामगारांच्या संदर्भात विविध योजनांची माहिती त्यांनी दिली, सर्वांनी कामगार नोंदणी करून घ्यावी व कामगारांच्या योजना लाभ घेण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात कृष्णा तामकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची महिती दिली.
या वेळी सुतार समाजातील ज्येष्ठ कलाकार ज्यांनी आयुष्यभर विश्वकर्माचे काम म्हणजे सुतार, लोहार शिल्पबांधकाम आदी कला जोपासता आपले आयुष्य व्यथीत केले, अशा ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. यात अनंता सपकाळ (भेलकेवाडी), ज्ञानेश्वर देशपांडे सुतार (धांगवडी), गोपाळ ननवरे (नसरापूर), रामचंद्र दीक्षित (नेरे), चंद्रकांत मोरे (पांडे) आदींना विश्वकर्मा पुरस्काराने सन्मानित केले.
यानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांना सन्मानित, तर कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरव केला. तर वैभव निगडे याची आर्मीसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला. या वेळी सोमनाथ भागवत समन्वयक अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ संजय राऊत, राहुल सुतार संस्थापक अध्यक्ष, भोर तालुका सुतार समाज कृष्णा तामकर, हनुमंत बापू सुतार, कार्याध्यक्ष पोपट तामकर, अधिकराव सुतार, पांडुरंग निगडे, आनंदा सुतार, आदेश गरुड, विजय तामकर, गोरक्ष सुतार, सुरेश सुतार, किरण देशपांडे सचिन मोरे, धनाजी पवार उपस्थित होते.
२८भोर विश्वकर्मा