मुलांमधील दृष्टिदोष वाढताहेत, पण ते टाळताही येतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:09+5:302021-07-16T04:09:09+5:30
डोळे हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव पण तो तुलनने तितकाच नाजूक, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डोेळे सदैव ...
डोळे हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव पण तो तुलनने तितकाच नाजूक, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डोेळे सदैव काम करतात आणि डोळ्यांमुळेच आयुष्य रंगीत होतं. पण हल्ली डोळ्यांची काळजी घेण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसते. विशेषत: मुलांमध्ये डोळ्यांचे विकास वाढत असल्याची माहिती डॉ. मंजूषा शित्रे यांनी दिली. सध्या वाचनाबरोबरच, अभ्यास गेम्स, व्हिडीओज अशा करमणुकीच्या साधणांमुळे मुलांच्या डोळ्यावर ‘डिजिटल स्ट्रेस’ वाढतोय. त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे आणि डोळ्यांच्या काळजी घेताना त्यांना डोळ्यांना पुरक पोषण आहार देणे गरजेचे आहे.
सामान्यत: मुलांमधील दृष्टिदोषाचे प्रकार असे
समीप दृष्टी (मायोपिया) - यामध्ये मुलांना जवळचे स्पष्ट दिसते मात्र लांबचे चित्र धूसर दिसते डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या झाल्याने असा दोष निर्माण होतो, चष्मा वापरून हा दोष दूर करता येऊ शकतो.
दूरदृष्टी (हाइपरमेट्रोपिया)- यामध्ये दूरचे स्पष्ट दिसते मात्र जवळच्या वस्तूवर नजर फोकस करू शकत नाही. डोळ्यांच्या बाहुल्या कमी झाल्यामुळे हा दोष निर्माण होतो. प्लस नंबरचा चष्मा वापरून हा दोष दूर करता येऊ शकतो. आळशी डोले (एम्बलायोपिया)- हा आजार नवजात बालकांमध्ये आणि अत्यंत छोट्या वयात जास्त दिसतो. या आजारामध्ये एका डोळ्याचा दुसऱ्या डोळ्याला दिसणाऱ्या प्रतिमांमध्ये फरक असतो. ज्यामुळे सामान्य दृष्टी विकसित होत नाही. चष्मा वापरूनही त्यांना स्पष्ट दिसने कठीण होते. विशेषत: एकाच डोळ्यामध्ये हा आजार निर्माण होतो. साधारण आठ वर्षांच्या आधी असा उपचार केला नाही तर दोष वाढत जातो. स्ट्राबिस्मस- यामध्ये समोरची दृष्य एकसारखे दिसत नाहीत, त्यांचा आकार लहानमोठा दिसतो, वेळेत हा आजार कळाला तर शस्त्रक्रियेतून हा दोषही दूर करणे शक्य आहे.
--
यो गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
- जर तुमचा मुलगा डोळे मिचकावून, बारीक करून पाहत असेल
- सारखेच डोळे चोळत असेल.
- टीव्ही पाहताना, वाचताना, किंवा डोळे बंद करताना एका बाजूला डोेके झुकवत असेल - खूप जवळून टीव्ही, संगणक, मोबाईल स्क्रीन पाहत असेल.
-पुस्तके डोळ्यांच्या खूप जवळ धरून वाचत असेल.
- अनेक दिवसांपासून डोळ्यांच्या वेदना, डोकेदुखी असेल
———-
यो गोष्टी आवर्जून करा
‘टोकदार आणि डोळ्यांना इजा होईल अशा खेळण्यांपासून मुलांना दूर ठेवा
धूळ, माती आणि कडक उन्हात मुलांना जास्त खेळू देऊ नका
काजळ, सुरमा आदी गोष्टी अजिबात लावू नका.
लहान वयाचत सतत हात धुण्याची सवय लावा त्यामुळे हातातील जंतूंचा डोळ्यांना संसर्ग होणार नाही.
मोबाईल, टीव्ही पाहण्यासाठीच्या वेळा ठरवा, अधिक वेळ पाहणे टाळा.
दररोज ६ ते ८ ग्लास पाणी द्या, त्यामुळे डोळे कोरडे पडणार नाहीत.
झोपेच्या वेळा पाळा आणि पूर्ण झोप घेऊ द्या,
वाचन करताना किंवा टीव्ही पाहताना वाकून किंवा लोळून पाहणे टाळा.
मुलांना घरात कायम कोंडून न ठेवता बाहेरील निसर्ग पाहण्याची सवय लावा
अंधुक प्रकाशात वाचन करणे टाळा.
झोपताना डोक्यावर पांघरून घेऊन मोबाईल पाहत झोपण्याची सवय लावू नका.