Vote कर पुणेकर! पुण्यात मोहोळ की धंगेकर? शिरूर, मावळातही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 09:30 AM2024-05-13T09:30:16+5:302024-05-13T09:30:59+5:30
पुणे, शिरूर आणि मावळ या तीनही मतदारसंघात एकतर्फी लढत होईल, असे चित्र नसून तीनही मतदारसंघात दुरंगी लढतीचे चित्र
पुणे: जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३) मतदान होत आहे. यात जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील तब्बल ५९ लाख ६६ हजार ७९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत. यापैकी अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी बाहेर काढून मताची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान प्रशासनासह उमेदवारांवर आहे. यात ३१ लाख १० हजार ७८३ पुरुष; तर २८ लाख ५४ हजार ६८१ स्त्री मतदार आहे. तसेच ६१५ तृतीयपंथी मतदार आहे. पुणे, शिरूर आणि मावळ या तीनही मतदारसंघात एकतर्फी लढत होईल, असे चित्र आज तरी दिसत नाही. तीनही मतदारसंघात दुरंगी लढतीचे चित्र आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण २५ लाख ३९ हजार ७०२ मतदार आहेत. यापैकी १३ लाख ३६ हजार मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदान केंद्राकडे रवाना होताना अधिकारी. ८२० पुरुष; तर १२ लाख २ हजार ६७९ महिला मतदार आहे. येथे हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ८१ हजार ९०४ मतदार आहे. आंबेगावमध्ये सर्वात कमी ३ लाख २१ हजार १ मतदार आहे. येथे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरशीची लढत आहे.
श्रीरंग बारणे की संजोग वाघेरे-पाटील?
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात. एकूण मतदार १३ लाख ६५ हजार १०१ आहे. चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६ लाख १८ हजार २४५ मतदार; तर मावळमध्ये
३५ उमेदवार रिंगणात
पुणे लोकसभा मतदारसंघात ३५ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, महायुतीतर्फे भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात प्रमुख लढत आहे. येथे २० लाख ६१ हजार २७६ मतदार असून, १० लाख ५७ हजार ८७० पुरुष, तर १० लाख ३ हजार ८२ महिला मतदार आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४ लाख ६७ हजार ६६९ मतदार असून, सर्वाधिक कमी मतदार कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात म्हणजे २ लाख ७६ हजार ९९७ मतदार आहेत.
३ लाख ७३ हजार ४०८ मतदार आहे. येथे खासदार श्रीरंग बारणे हे महायुतीकडून हॅट्ट्रिकसाठी झुंज देत आहेत. महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.