जिल्हा परिषद सदस्या वैशाली प्रतापराव पाटील यांच्या सुष्ना असलेल्या वृषाली पाटील या पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करत मताधिक्याने निवडून आल्या आहेत. यातच सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने पाटील घराण्याची राजकीय प्रतिष्ठा उंचावली आहे. याशिवाय माजी उपसरपंच भरत राजेभोसले यांचे चिरंजीव विशाल राजेभोसले यांनीही प्रथमच निवडणूक लढवित विजय प्राप्त केला. येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एच. एस. ननवरे, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब वाघ यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंतायतीचे नवनिर्वाचित १५ सदस्य उपस्थित होते. सरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वृषाली संग्राम पाटील यांचा एकमेव अर्ज आला. तर उपसरपंच पदासाठी विशाल भरतराव राजेभोसले, परशुराम सावता गायकवाड, योगेश तात्याबा खारतोडे या तीन सदस्यांनी अर्ज दाखल केले. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत योगेश तात्याबा खारतोडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर उरलेल्या दोन सदस्यांपैकी उपसरपंचपदी निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचे ठरले. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये परशुराम सावता गायकवाड यांना तीन मते मिळाली. तर विशाल भरतराव राजेभोसले यांना १२ मते मिळाली. यामुळे विशाल राजेभोसले यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिका-यांनी जाहीर केले.
फोटो - वृषाली पाटील (सरपंच) विशाल राजेभोसले (उपसरपंच) ...............