विद्यार्थी वर्गात प्रवेश करण्याअगोदर टेंपरेचर घेण्यात आले आणि सॅनिटाईझ करण्यात आले. इयत्ता ५ वीसाठी १०१, तर इयत्ता ८ वी साठी ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून कहाणे व्ही. व्ही., तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दुंडे एस. के. यांनी जबाबदारी पार पाडली.
खरंतर कोविड १९ चा सर्वाधिक फटका बसलेली ही बॅच. कोविड कालावधीत शाळा बंद असताना देखील सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी ऑनलाईन, तसेच ऑफलाईन माध्यमातून आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सज्ज केले.
कोविड पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षेच्या नियोजित तारखेत बदल करण्यात आले. परंतु, दि. १२ ऑगस्ट रोजी कोविड नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.