वारकरी आजही पत्राद्वारे कळवतोय खुशाली, टपाल खात्याची विशेष सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:39 AM2018-07-10T02:39:42+5:302018-07-10T02:39:55+5:30

घरोघरी आणि हातोहाती मोबाइल आल्यानंतर पत्रव्यवहार करणाऱ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्लिकेशनमुळे मेसेज आणि आॅनलाइन बँकिंगमुळे पैसे काही क्षणांत एकमेकांना पाठवणे शक्य होते.

 Warakaris will also send a letter to the letter, special post office facility | वारकरी आजही पत्राद्वारे कळवतोय खुशाली, टपाल खात्याची विशेष सोय

वारकरी आजही पत्राद्वारे कळवतोय खुशाली, टपाल खात्याची विशेष सोय

Next

पुणे - घरोघरी आणि हातोहाती मोबाइल आल्यानंतर पत्रव्यवहार करणाऱ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्लिकेशनमुळे मेसेज आणि आॅनलाइन बँकिंगमुळे पैसे काही क्षणांत एकमेकांना पाठवणे शक्य होते. असे असताना आजही टपाल खात्याकडून वारीत सहभागी झालेल्या वारकºयांसाठी टपालाची सेवा पुरविली जात आहे.
पुणे पोस्टल रिजनच्या समन्वयाने गेल्या तीन वर्षांपासून खास वारकºयांसाठी ही सुविधा पुरविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मोबाइलच्या जमान्यात देखील सध्या अनेक वारकरी या सेवेचा लाभ घेत आहेत. पोस्टाची ही सेवा केवळ पत्रांपुरती मर्यादित नसून मनीआॅर्डरदेखील स्वीकारण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत ५८७ वारकºयांनी या सुविधेचा वापर केला. तर एकूण २२ हजार ९२४ रुपयांचे स्टॅम्प विकले गेले आहेत, अशी माहिती टपाल विभागाकडून देण्यात आली. वारकºयांची खुशाली कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी म्हणून पोस्टाची एक गाडी दिंडीसोबत असते. एक चालक आणि दोन कर्मचारी अशी तिघांची टीम त्यासाठी २४ तास कार्यरत आहे. त्यांच्याकडे टपालाचे तिकीट आणि पत्रांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वारकºयांना पत्र पाठवायचे असेल तर त्यांनी या कर्मचाºयांशी संपर्क साधायचा. योग्य ते तिकीट खरेदी करायचे आणि पत्ता टाकून पत्र कर्मचाºयांकडे जमा करायचे. एखाद्या वारकºयाला लिहिता-वाचता येत नसेल तर पोस्टाचे कर्मचारी त्यांना पत्रदेखील लिहून देतात.
जमा झालेली सर्व पत्रे जवळच्या टपाल कार्यालयात जमा करण्यात येतात. त्यानंतर पत्रांचा इच्छित स्थिळी जाण्याचा प्रवास सुरू होतो. पत्रासाठी ५० पैशांची पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, तिकिटे उपलब्ध आहेत.
तर मनीआॅर्डर प्राप्त करण्यासाठी कोणतेही कमिशन नाही.
विशेष म्हणजे या सेवेसाठी वेगळा किंवा जास्त दरदेखील ठेवण्यात आलेला नाही. वारीत सहभागी होत असलेल्यांमध्ये वृद्धांची संख्या मोठी आहे. त्यातील सर्वांकडेच मोबाइल नाही, तर काही वारकरी सुरक्षेच्या दृष्टीने मोबाइल आणत नाही. त्यामुळे ते पूर्वीप्रमाणे पत्राच्या माध्यमातून घरच्यांना त्यांची खुशाली कळवतात.

वारीसाठी खास पोस्टकार्ड
वारीतून पाठविण्यात आलेले पत्र अनोखे असावे म्हणून विभागाने वारीसाठी खास पोस्टकार्डदेखील तयार केले आहे. त्यावर
संतांची चित्रे प्रसिद्ध करण्यात
आली आहेत.
त्यामुळे वारकरीदेखील याच कार्डला पसंती देताना दिसत
आहे. १० रुपयांना असणारे
हे कार्ड अनेकांना आकर्षित
करीत आहे.

Web Title:  Warakaris will also send a letter to the letter, special post office facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.