निमसाखर येथे ग्रामपंचायतीच्या मालकीचे सुमारे ३९ व्यवसायीक गाळे असुन या पैकी बऱ्याच गाळे धारकांचे गाळा भाडे अनामत रक्कमे एवढे तर काहिंचे अनामत रक्कमे पैक्षा हि जास्त झाले आहे. सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये एवढी थकीत रक्कम काहि गाळा धारकांनकडे असुन अशा गाळे धारकांचे गाळे सिल करून कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीचे सरासरी गाळे भाडे ७५ रुपयां पासून ते ४०० रुपयां पर्यंत असुन सदरील गाळे धारकांना वारंवार सुचना करून तसेच नोटीस देऊन हि गाळा भाडे भरले नसल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.सध्या अशा गाळे धारकांना अंतिम नोटीस बजावण्यात आली असुन दिलेल्या मुदतीत भाडे न भरल्यास पोलीस सुरक्षा घेऊन अशा गाळ्यांना टाळे ठोकण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे यांनी सांगितले आहे.
थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:10 AM