पुणे शहराच्या 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद

By निलेश राऊत | Published: September 13, 2022 02:40 PM2022-09-13T14:40:21+5:302022-09-13T14:40:39+5:30

शुक्रवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

Water supply in this area of Pune city will be closed for whole day on Thursday | पुणे शहराच्या 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद

पुणे शहराच्या 'या' भागातील पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद

Next

पुणे : लष्कर जलकेंद्र, वानवडी, पर्वती तसेच एसएनडीटी जलकेंद्रातील तांत्रिक कामामुळे या जलकेंद्रांतर्गत करण्यात येणारा पाणीपुरवठा येत्या गुरूवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार, दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी याबाबत माहिती दिली.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :

वानवडी. इएसआर व हाय सर्विस टाक्यांखालील भाग : - वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण डिफेन्स एरिया विभागाचा भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू, रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी कवडे मळा संपूर्ण परिसर, बी. टी. कवडे रोड व संपूर्ण परिसर, प्रभाग क्र. २५ संपूर्ण परिसर.

पर्वती एचएलआर : पर्वती एचएलआर, पर्वती गाव, सहकारनगर संपूर्ण, तावरे कॉलनी, आदर्श नगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकरनगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, एसबीआय कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर - बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, एसटी कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर धनकवडी (चव्हाणनगर).

सेमिनरी जीएसआर : अप्पर इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, स. नं. ३५४, मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबानगर, स. नं. ४२, ४३, युनिटी पार्क, ज्ञानेश्वर नगर, सवेरा पार्क परिसर.

एसएनडीटी : शिवाजीनगर परिसर, भांडारकर रोड, बी. एम. सी. सी. रोड, रेव्हेन्यू कॉलनी, गोखलेनगर, मॉर्डन कॉलनी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापती बापट रोड, कोथरूड (डहाणूकर कॉलनी, तेजसनगर, कोथरूड गावठाण, जोग शाळेजवळील भाग, भेलकेनगर, गुजरात कॉलनी, सुतार दवाखान्यामागील परिसर, गाडवे कॉलनी, परमहंस नगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, गुरुराज सोसायटी, इन्कमटॅक्स कॉलनी, वनाज परिसर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, जय भवानीनगर, किस्किदानगर, एम. आय. टी. कॉलेज परिसर, प्रभाग ३१चा वडार वस्ती, स्टेट बँक नगर, हैप्पी कॉलनी, पृथ्वी हटिल परिसर, मेघदूत सोसायटी.

Web Title: Water supply in this area of Pune city will be closed for whole day on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.