पाणी पुरवठा आजपासून सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 03:40 AM2018-09-29T03:40:50+5:302018-09-29T03:41:01+5:30

शहरात गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटी दुर्घटनेची सर्व चौकशी पाटबंधारे खात्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 The water supply is smooth from today | पाणी पुरवठा आजपासून सुरळीत

पाणी पुरवठा आजपासून सुरळीत

Next

पुणे : शहरात गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटी दुर्घटनेची सर्व चौकशी पाटबंधारे खात्यांच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये ५०० पेक्षा अधिक झोपड्या बाधित झाल्या असून, रात्री उशिरापर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. दरम्यान कालवा फुटीमुळे शहरातील काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झााला असून, लष्कर जलकेंद्राला पाणी पुरवठा करण्यासाठी कालव्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. यामुळे शनिवारपासून, हडपसर, नगररोड, कोंढवा या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले की, कालवा फुटीच्या घटनेमध्ये दांडेकर पूल झोपडपट्टीमधील घरांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकेच्या वतीने नुकसानीचे पंचनामे होत आहेत.

Web Title:  The water supply is smooth from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.