जे वाटतं ते बोलण्यासाठी देशात मोकळं वातावरण हवं : राहुल देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:01+5:302021-02-10T04:13:01+5:30
पुणे : देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून, काय वाटतं ते मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यात कुणाची आडकाठी नको. राज्यसरकारने ...
पुणे : देशात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून, काय वाटतं ते मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यात कुणाची आडकाठी नको. राज्यसरकारने ट्विटची चौकशी करावी, हवं तर माझ्याही ट्विटची चौकशी करावी, अशी मिश्कील टिप्पणी प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे याने केली.
शेतकरी आंदोलनासंबंधी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्विटचे समाजातील सर्वस्तरातून पडसाद उमटले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यासंबंधी राहुल देशपांडे यांना पत्रकारांनी विचारले असता, कलाकार होण्याआधी देखील ते एक नागरिक आहेत, असे तो म्हणाला. हा कलाकाराचा वैयक्तिक विषय आहे.
जे वाटतं ते बोलण्यासाठी मोकळं वातावरण देशात असायला हवं. राज्यसरकारने ट्विटची चौकशी करावी हवं तर माझ्याही ट्विटची चौकशी करावी. मला जे वाटतं ते मी बोलतच राहणार, असे त्याने ठामपणे सांगितले.
.......