हवामानाचा डाटा आता मोबाईलद्वारे होणार संकलित, आयएमटीचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:33 PM2018-03-22T22:33:25+5:302018-03-22T22:33:25+5:30

हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे़. सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़.

Weather data will now be compiled by mobile, IMT project | हवामानाचा डाटा आता मोबाईलद्वारे होणार संकलित, आयएमटीचा प्रकल्प

हवामानाचा डाटा आता मोबाईलद्वारे होणार संकलित, आयएमटीचा प्रकल्प

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक हवामान दिन विशेषअचूक अंदाजासाठी होणार मदत बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार

पुणे : भारतासारखा लहरी हवामान असलेल्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी अधिक अचूक डाटा अत्यावश्यक असतो़. हा डाटा कोणत्याही अडथळ्याशिवाय नियमितपणे उपलब्ध व्हावा, यासाठी हवामान विभाग आता त्यांच्या सर्व स्वयंचलित हवामान केंद्रातील माहितीचे संकलन जीपीआरएस बेस असलेल्या मोबाईलद्वारे करणार आहे़. त्यामुळे त्यातील मानवी हस्तक्षेप कमी होऊन अधिक विश्वसनीय माहितीचा साठा उपलब्ध होणार आहे़. त्यामुळे हवामानाचा अधिक अचूक अंदाज व्यक्त करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे़ .
हवामान विभागामार्फत देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक स्वयंचलित हवामान केंद्र आहे़.तसेच देशभरात १३५० पर्जन्यमापन केंद्रे आहेत़.या ठिकाणी वातावरणाची आर्द्रता, हवेचा वेग, जमीन तापमान अशी माहिती दर तीन तासांनी घेतली जाते़ . सध्या ही माहिती सॅटेलाईट सेंटरद्वारे पुण्यात येते़. यातील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, त्यात सातत्य राहावे, यासाठी आता या सेंटरमध्ये मोबाईल चीप बसविण्यात येणार आहे़ .त्याद्वारे दर तीन तासांनी संकलित झालेला डाटा हा थेट पुण्यातील हवामान केंद्रामधील संगणकावर उपलब्ध होणार आहे़. या प्रकल्पाची सुरुवात झाली असून, मार्च २०१९पर्यंत तो पूर्ण होणार आहे़ . हा डाटा उपलब्ध झाल्याने कृषी व सर्वसाधारण हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ मनीष रनाळकर यांनी दिली़. 

......................
किनारपट्टीवर हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम...
भारतातील किनारपट्टीवर नेहमीच चक्रीवादळाचा धोका असतो़. या काळात वाऱ्यांचा वेग सर्वाधिक असतो़. चक्रीवादळात अनेकदा घरे,  वृक्ष उन्मळून पडतात़ अशावेळी वाऱ्याच्या वेगाची अचूक मोजणी व्हावी, यासाठी हवामान विभागाने हायविंड रेकॉर्डिंग सिस्टिम विकसित केली आहे़. सध्या ही पूर्व किनारपट्टीवरील १९ ठिकाणी लावण्यात आली आहे़ .पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरील ७० जिल्ह्यांत ही सिस्टिम एका वर्षात लावण्यात येणार आहे़ ................
विमानतळावर दृष्टी सेन्सर...
विमानतळावर विमानांच्या उड्डाण व उतरतेवेळी वैमानिकांना तेथील हवामानाची अचूक माहिती मिळणे तसेच धावपट्टीवरील दृश्यमानता नेमकी किती आहे,याची माहिती महत्त्वाची असते़. यासाठी हवामान विभागाने दृष्टी सेन्सर बनविले आहे़ . त्यासाठी बंगळुरूच्या नॅशनल एरोस्पेस लॅबबरोबर हवामान विभागाचा करार झाला आहे़. देशातील विमानतळापैकी २० विमानतळांवर सध्या हे सेन्सर बसविण्यात आले असून, या वर्षभरात आणखी २० ठिकाणी असे सेन्सर बसविण्यात येणार आहेत़ .

Web Title: Weather data will now be compiled by mobile, IMT project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.