गणेश मंडळांना परवानगीसाठी स्वतंत्र संकेतस्थळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 08:26 PM2019-07-20T20:26:23+5:302019-07-20T20:40:07+5:30

यावर्षी मंडळांना सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच क्लिकवर उपलब्ध होणार असून त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.

website for Ganesh Mandal's permission in pune | गणेश मंडळांना परवानगीसाठी स्वतंत्र संकेतस्थळ

गणेश मंडळांना परवानगीसाठी स्वतंत्र संकेतस्थळ

Next
ठळक मुद्देपालिका, वाहतूक पोलीस आदी स्वरुपाच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरु महापालिकेच्यावतीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार

पुणे : गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग सुरु झाली असून पालिका, वाहतूक पोलीस आदी स्वरुपाच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरु जाते. यावर्षी मंडळांना सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच क्लिकवर उपलब्ध होणार असून त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. उत्सव काळातील प्रदुषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासोबतच स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. हौदामध्ये गणेशमुर्ती विसर्जित करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले.
गणेशोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने महापालिकेच्यावतीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पालिकेमध्ये घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, शांतनू गोयल, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र रसाळ यांच्यासह प्रमुख मंडळांचे पदाधिकारी आणि महापालिकेचे अधिकरी उपस्थित होते.
  श्रीमंत दगडू शेठ हलवाई ट्रस्टचे महेश सुर्यवंशी यांनी महापौर, उपमहारौरांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. मंडपाच्या आकारात बदल होणार नसल्याच पाच वर्षांसाठी परवाना देण्यात यावा. स्वच्छता राखण्यासाठी मोबाईल टॉयलेटची दहा दिवसांसाठी व्यवस्था करावी अशी मागणी केली. तर मंडई मंडळाचे अण्णा थोरात म्हणाले, पालिकेने तयार केलेल्या संकेतस्थळाची जाहीरात केल्यास त्याची माहिती जास्तीतजास्त मंडळांपर्यंत पोचेल. मंडळांचे प्रशासनाला सहकार्य राहणारच असून पोलीस आणि पालिका अधिकाºयांनीही मंडळांना भेटी द्याव्यात. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते म्हणाले, राजकीय वरदहस्त असलेली मंडळे नियम मोडतात, मात्र नियम पाळणाºयांना आणि वरदहस्त नसलेल्या मंडळांना त्रास दिला जातो. बाहेरील स्पिकरवाल्यांना शहरात येऊ देऊ नये. पोलीस उपायुक्त घट्टे म्हणाले, यांनी कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय आवश्यक असल्याचे नमूद केले. न्यायालयाच्या निदेर्शांचे पालन करुन उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
=====
गणेशोत्सव आनंददायी होण्यासाठी शासन पातळीवरील बैठकीत अनेक मुद्दे चर्चिले गेले आहेत.  मंडप परवान्याची प्रक्रिया संकेतस्थळामुळे सोपी झाली असून स्वच्छता, पाण्याची समस्या, हरीत गणेशोत्सव साजरा होणे पालिकेची जबाबदारी आहे. कमानींबाबतच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. यंदाही रात्रीच्या वेळी पालिकेकडून स्वच्छता केली जाणार असून त्यासाठी कर्मचाºयांची संख्या वाढविण्यासोबतच निर्माल्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी व्यवस्था केली जाणार आहे. 
- सौरभ राव, आयुक्त, पुणे महानगरपालिका
=====
गणेश मंडळांनी केलेल्या प्रमुख मागण्या
* पूर्वभागातील मंडळांना गर्दी होण्यासाठी उपाय करावेत. 
* परवाना देण्याचे काम शनिवारी व रविवारी सुरू ठेवावे. 
* कागदपत्रे कमी असलेल्या मंडळांना फोन करून कल्पना द्यावी. 
* कमानींची संख्या चार वरून सहा करावी. मंडळांचे उत्पन्नाचे साधन कमानी आहेत. 
* स्पिकरसंबंधी भुमीका स्पष्ट करावी, अर्ज केल्यानंतर परवाना कधी मिळेल याचा खुलासा व्हावा.
* खड्डे बुजविण्याचा खर्च मंडळांना लावू नये, तो खर्च संबंधित भागाच्या नगरसेवकांच्या निधीतून करावा.

Web Title: website for Ganesh Mandal's permission in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.