महाविद्यालयाकडून पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:41+5:302021-02-16T04:11:41+5:30
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे तब्बल अकरा महिन्यांनंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. सोमवारी (दि.१५) कोंढवा बुद्रुक येथील गुरुवर्य सदानंद महाराज ...
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे तब्बल अकरा महिन्यांनंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. सोमवारी (दि.१५) कोंढवा बुद्रुक येथील गुरुवर्य सदानंद महाराज कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कोंढवा भागातील नामांकित पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन नरेंद्र मरळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर इत्यादी वस्तूंचे वाटप केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, डॉ. विवेकानंद ससाणे, प्रा. राजेंद्र डोके, प्रा. सोनाली घोलप, प्रा. सुवर्णा पैलवान, प्रा. कैलास लव्हाळे, प्रा. नीलम गोयल, प्रा. गोपिका परदेशी, प्रा. संदीप इंगळे, सुखदेव लोणकर, अमोल वाघ, राहुल कामठे उपस्थित होते.