भीज पावसाने खरीप पिकांना नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:58+5:302021-08-22T04:13:58+5:30
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पिकांचे क्षेत्र जास्त आहे. जुलै महिन्याचे पहिल्या आठवड्यातही पावसाने ओढ दिली होती. मात्र त्यानंतर ...
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पिकांचे क्षेत्र जास्त आहे. जुलै महिन्याचे पहिल्या आठवड्यातही पावसाने ओढ दिली होती. मात्र त्यानंतर १२ जुलै रोजी झालेल्या भीज पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला होता. पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्याने पूर्व भागातील खरीप पिके सुकण्याच्या अवस्थेत आली होती. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून या भागातही ढगाळलेले वातावरण झाले. भीज पाऊस काही प्रमाणात पडत होता. मात्र, आज सकाळपासून भीज पावसाने गती पकडली. सुमारे तीन तास सकाळी पाऊस पडला. पुन्हा दुपारनंतर पाऊस पडत आहे. या भीज पावसाने पूर्व भागातील पिंपरीपेंढार, वडगाव आनंद, पिंपळवंडी, वडगाव कांदळी, बोरी, आळेफाटा, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, उंचखडक, बेल्हा व लगतच्या गावांमध्ये तसेच पठारभागातील आणे व परिसरातील खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. अगदी सुरुवातीपासूनच मोसमी पावसाने या भागात अद्यापही गती न पकडल्याने ओढे नाले खळखळून वाहिले नसून पाणी पातळीतही वाढ झाली नाही.