कोरोनात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चे काय होणार? कंपन्यांकडूनही घेतली जातीये ‘बेसिक टेस्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:26 PM2022-04-12T17:26:49+5:302022-04-12T17:27:07+5:30

पुणे : कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कामगार भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. मात्र, विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन ...

What about theplacement of students who have passed in Corona | कोरोनात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चे काय होणार? कंपन्यांकडूनही घेतली जातीये ‘बेसिक टेस्ट’

कोरोनात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेंट’चे काय होणार? कंपन्यांकडूनही घेतली जातीये ‘बेसिक टेस्ट’

googlenewsNext

पुणे : कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कामगार भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. मात्र, विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड न करता आता कंपनी स्वत:च परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत आहे. त्यामुळे कोरोनाने विद्यापीठांकडून देण्यात आलेल्या गुणपत्रिकेचे महत्त्व कमी केल्याची चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात केली जात आहे.

गेल्या दोन वर्षांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक)करता आले नाही. त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे (एमसीक्यू) झालेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्यामुळे नोकरी कोणाला द्यावी, असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला. त्यामुळे कंपन्यांनी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वत:च परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे.

कंपन्यांकडून प्लेसमेंट देताना विद्यार्थ्यांचा पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंतची शैक्षणिक प्रगती पाहिली जाते. मात्र,गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षा नीटपणे दिल्या नाहीत. तसेच एका वर्गातील बहुतांश सर्व विद्यार्थ्यांना ८० ते ९० टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे कोरोनाकाळाच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अधिक आहे की इतर वर्षीसुद्धा संबंधित विद्यार्थ्यांची प्रगती चांगली होती हे कटाक्षाने तपासले जात आहे.

''कोरोनाचे निर्बंध उठले असले तरी आयटी कंपन्यांना आपल्या कामगारांकडून ऑनलाईन पद्धतीने करून घेणे परवडत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून लहान-मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लेसमेंट होत आहेत. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. परिणामी कंपन्यांकडून प्लेसमेंट पूर्वी विद्यार्थ्यांची एक ‘बेसिक टेस्ट’ घेतली जात आहे. त्यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड करूनच त्यांना कंपनीत काम करण्यासाठी पुढील प्रशिक्षण दिले जात आहे. - डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'' 

Web Title: What about theplacement of students who have passed in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.