कॅ न्टीनच्या भिंतीवरील चित्रांत कसली अभिव्यक्ती? एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांमध्येच फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:37 AM2018-07-10T02:37:17+5:302018-07-10T02:37:30+5:30

फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मधील दोन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमुळे पुन्हा एकदा संस्थेमधील वातावरण अशांत बनले आहे. मात्र, याच अभिव्यक्तीच्या कृतीवरून विद्यार्थ्यांमध्येच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 What is the expression in the pictures on the walls | कॅ न्टीनच्या भिंतीवरील चित्रांत कसली अभिव्यक्ती? एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांमध्येच फूट

कॅ न्टीनच्या भिंतीवरील चित्रांत कसली अभिव्यक्ती? एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांमध्येच फूट

googlenewsNext

पुणे  - फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मधील दोन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमुळे पुन्हा एकदा संस्थेमधील वातावरण अशांत बनले आहे. मात्र, याच अभिव्यक्तीच्या कृतीवरून विद्यार्थ्यांमध्येच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई ही अभिव्यक्तीवर हल्ला असल्याचे काही विद्यार्थी सांगत आहेत, तर दुसरीकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॅन्टीनच्या भिंती तसेच दरवाजावर चित्र काढण्याला अभिव्यक्ती म्हणता येणार नाही. तुमची अभिव्यक्ती ही तुम्ही तयार करणाºया फिल्म्समध्ये दाखवा, असे परखड मत व्यक्त करीत त्या दोन विद्यार्थ्यांची कृती ही चुकीची असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एफटीआयआयचे कॅन्टीन नूतनीकरणासाठी काही दिवस बंद होते. नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर एका दिवसातच संस्थेतील दोन विद्यार्थ्यांनी कँन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाजावर चित्रे काढली. या चित्रांमध्ये एका चित्रात कवी फैज अहमद फैज यांच्या कवितेच्या हम देखेंगे या ओळी लिहिण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी हेतुपुरस्पर दहशत पसरविण्याच्या हेतूने ही चित्रे काढली असल्याचे एफटीआयआयचे संचालकाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सुरक्षारक्षकांनी हटकल्यानंतरही विद्यार्थ्यांनी ही चित्रे काढली. नूतनीकरण केलेल्या कॅन्टीनचे उद्घाटन होऊन एकच दिवस झाला होता, तोच दोन विद्यार्थ्यांनी कँन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाजावर चित्रे काढून कँन्टीन विद्रूप केल्यामुळे संस्थेच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामे करण्याची नोटीस पाठविली. मात्र, विद्यार्थ्यांना समज देऊनही नोटीस मागे घेतल्याचे कळते. दोन वर्षांपूर्वी एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. तब्बल सहा महिने हे आंदोलन विद्यार्थ्यांनी चिघळत ठेवले. मात्र, शासनाने विद्यार्थ्यांना वेसण घालण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा अवलंब केला. त्यातून काही विद्याथर््यांनी चांगलाच धसका
घेतला आहे.

दोन विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या कँन्टीनच्या भिंतीवर तसेच दरवाजावर चित्र व घोषणा लिहून कँन्टीन विद्रूप केले आहे. रात्रीच्या वेळेस हे काम केले असून, एफटीआयआयच्या सुरक्षारक्षकांनी हटकल्यानंतरही विद्यार्थी थांबले नाहीत. नूतनीकरण केलेल्या कँन्टीनचे उद्घाटन होऊन एक दिवस झाला होता तोच विद्यार्थ्यांनी ते विद्रूप केल्याने ते कदापि स्वीकारण्यासारखे नाही. एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांनी नूतनीकरण केलेल्या कॅन्टीनचे कौतुक केले होते. त्यांनी या विद्यार्थ्यांच्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकांनीदेखील या कृत्याचा निषेध केला आहे. - भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय

Web Title:  What is the expression in the pictures on the walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.