पुणे : भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खंडन केले आहे. खडसेंची केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्ताला काही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.
जळगावमध्ये एकनाथ खडसे, माजी मंत्री गिरीष महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. मात्र, यामध्ये नाराजीवर चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. आज चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये होते. यावेळी त्यांना यावर छेडण्यात आले. शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय, कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली त्यामुळे भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले, सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्यावे, अशी बोचरी टीका पाटील यांनी शिवसेनेवर केली.
सत्तेसाठी सरकारने नीतीमुल्ये सोडली आहेत. जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही पडलेले नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाले. इतरांचे त्यांना काही पडलेले नाही. रावते, गोगावले, जाधव यांना त्यांनी डावलल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच विधानसभा अध्यक्षाची निवडणूक आजही गुप्त मतदानाद्वारे घेऊन दाखवावी असे आव्हानच पाटील यांनी सत्ताधाऱी महाराष्ट्र विकास आघाडीला दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
नेते सत्तासंघर्षात मश्गुल; 300 शेतकऱ्यांनी जीवन संपविले
बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार
सुलेमानीवरील हल्ला जगाला महागात पडणार; कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या
फडणवीस-महाजनांचं खडसेंसोबत चहापान; पण 'कपातील वादळ' जैसे थे!
महाविकास आघाडीत खाते बदलावरून धुसफूस; अजित पवार- अशोक चव्हाणांमध्ये खडाजंगी?