पिंपरी : एक नागरिकाला मेडिकल दुकानदाराने मागितलेल्या गोळी ऐवजी दुसऱ्याच नावाची गोळी दिली. म्हणून दुकानदाराला त्याचा जाब विचारला असता लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. देहू -आळंदी रोड, मोशी येथे सोमवारी (दि. २२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
मधुकर प्रल्हाद कुडुक (वय ३९, रा. चिखली) यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश रामदास बोरुडे (रा. मोशी), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्या मालकीचे देहू -आळंदी रोड येथे मिलीग्राम केमिस्ट अँड ड्रगिस्ट स्वराज कॅपिटल या नावाचे औषध विक्रीचे दुकान आहे. मेडिकल चा मालक निलेश बोरुडे याने वो-२ नावाच्या गोळी ऐवजी वो-झेड नावाची गोळी दिली. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी शिवा घालून शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात जोरात मारून फिर्यादीला जखमी केले.