फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:47 AM2018-06-13T01:47:19+5:302018-06-13T01:47:19+5:30
फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात, तेव्हा त्यांच्या फोटोग्राफर बांधवाच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण असतो. चौफुला (ता. दौंड) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या फोटोग्राफी करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
केडगाव : फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात, तेव्हा त्यांच्या फोटोग्राफर बांधवाच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण असतो.
चौफुला (ता. दौंड) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या फोटोग्राफी करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये केडगावचे नवनिर्वाचित सरपंच अजित शेलार, लोणी व्यंकनाथचे सरपंच संतोष माने यांचा सामावेश करण्यात आला. सोनाली मोकाशी, शकुंतला हाडके व वंदना शिंदे आदी फोटोग्राफीशी संबधित असणा-या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य होते. यावेळी केडगाव फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मुळे म्हणाले की, फोटोग्राफर हा पडद्यामागचा हिरो आहे.
आयुष्यभर दुसया-या मोठेपण देणारे फोटोग्राफर जेव्हा गावकारभारी बनतात हा आमच्या समस्त बांधवांसाठी गौरवाचा क्षण असतो. म्हणुन फोटोग्राफर संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संघटनेच्या वतीने प्रसाद दरेकर, मोहीत खळदे, विशाल चव्हाण, दत्ता सस्ते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राजीव शिंदे, सप्रेम मुळे, रमेश जाधव, प्रवीण शेळके, विक्रम भांडवलकर, संतोष नासरे, नंदकुमार पाडुळे, गणेश काळे, मल्हारी वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोरमलनाथ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.