दुसर्या मुलाला डेट का करते? असे म्हणत तरुणीला दिली जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 06:55 PM2021-11-14T18:55:42+5:302021-11-14T18:55:58+5:30
काही वेळेला त्याने पाठलाग देखील केला. तसेच, अनोळखी ई-मेल अॅड्रेसवरून ई-मेल करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली आहे
पुणे : दुसर्या मुलाला डेट का करतेस, असे म्हणून एका तरुणाने उच्च शिक्षित तरुणीला वारंवार फोन, मेसेज, ई मेलद्वारे त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी २९ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मूळचा हरिद्वार येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १८ डिसेंबर २०२० पासून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी पुण्यातील आयसर संस्थेत शिक्षण घेत असून, वसतिगृहात राहते. तरुणाने तिला तू दुसर्या मुलाला डेट का करते अशी विचारणा केली. त्यानंतर त्या कारणावरून आरोपीने तरुणीला सातत्याने मोबाइलवर फोन, मेसेज करून त्रास दिला. काही वेळेला त्याने पाठलाग देखील केला. तसेच, अनोळखी ई-मेल अॅड्रेसवरून ई-मेल करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली आहे. या त्रासाला कंटाळून तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली आहे.