एमपीएस्सी मध्ये निवड होउनही नियुक्ती न झालेल्यांना लवकर सेवेत सामावून घेतले नाही तर आंदोलन करु असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. पुण्यात आज एमपीएस्सीची नियुक्ती रखडलेल्या मुलांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पडळकर बोलत होते.
२०१९ मध्ये परिक्षा होवुन निवड प्रक्रिया झालेल्या ४०० हून अधिक मुलांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. या विद्यार्थ्यांपैकी काहींवर शेतमजुरी करुन गुजराण करण्याची वेळ आली आहे. नियुक्त्या कधी होणार याचे स्पष्टीकरण दिले जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेत आज आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या गोपिचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला या प्रश्नावर धारेवर धरले आहे. पडळकर म्हणाले “ फडणवीस यांच्या काळात अधिकाऱ्यांची सर्वात मोठी भरती झाली. मराठा समाज आरक्षणात सरकार गंभीर नाही, त्यामुळे त्यांनी घोळ करून ठेवला
9 डिसेंबरला खंडपीठाने सांगूनही यांनी नियुक्ती केल्या नाही.”
रात्रंदिवस काम करणाऱ्या मुलांनी यश मिळवलं, सगळं मराठी गावगाड्यातली मुलं आहेत त्यांना नियुक्तीपत्र द्यावी अशी मागणी पडळकरांनी केली. या प्रक्रियेत 79 मराठा मुलं सर्वसाधारण मधून सिलेक्ट झालीत त्यांच्यावर अन्याय का असा सवाल विचारत पडळकर म्हणाले “ इतर वर्गातील मुलांवर अन्याय का? सरकारकडे मागणी करतो, इथे विद्यार्थी येणार होते,पण इथे दबावाचं वातावरण दिसतंय.मुलांचं भविष्य वाया घालवू नका, भावी अधिकारी आहेत.”
पोलिस दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले “ महाराष्ट्र सरकार पोलिसांना पुढे करतंय, परवाचे आंदोलनही पोलिसांनी मोडीत काढले.।सरकारला पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणायचा आहे.”
जर नियुक्त्या दिल्या नाहीत तर मुंबईत आंदोलन करू असा इशारा ही त्यांनी दिला.
सरकारने विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आणू नये, स्टाफ कमी असल्याचं म्हणता आणि नियुक्ती पत्र देत नाहीत हा विरोधाभास कसा काय असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केला