Pune unlock पुणेकरांना मिळणार का दिलासा? ०.१६% टक्क्यांनी पॉझिटिव्हिटी जास्त असल्याने अडचण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 03:16 PM2021-06-05T15:16:00+5:302021-06-05T15:17:44+5:30
महापालिका आज जाहीर करणार नियमावली
नव्या अनलॉक चा नियमावलीमध्ये पुणे शहराला पूर्ण दिलासा मिळणार की अंशतः आहे आज स्पष्ट होणार आहे. पाच टक्क्यांच्या खाली पॉझिटिव्हिटी जाणारी शहर जरी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये टाकली गेली असली तरी पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे पाच पॉईंट सोळा टक्के आहे आणि त्यामुळे पुणे शहराला कितपत दिलासा मिळणार ते पाहावे लागणार आहे.
राज्य सरकार तर्फे अनलॉक च्या प्रक्रियेची नवी नियमावली काल जाहीर करण्यात आली. यामध्ये पॉझिटिव्हिटी पाच टक्क्यांहून कमी असणारी आणि 25 टक्क्यांपेक्षा ऑक्सिजन बेड कमी भरलेले असणारी शहरे ही पहिल्या लेव्हलमध्ये टाकण्यात आली आहेत. तर पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी 25 ते 40 टक्के ऑक्सिजन बेड भरलेले असणारी शहरे ही दुसऱ्या टप्प्यात टाकण्यात आलेली आहेत. तिसऱ्या लेव्हल मध्ये एक ते दहा टक्के या दरम्यान पॉझिटिव्हिटी असणारी शहरे आहेत. पुणे शहरामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा पाच पॉईंट सोळा टक्के आहे तर 22 टक्के ऑक्सीजन बेड भरलेले आहेत. जर दुसऱ्या लेव्हल मध्ये पुणे शहराचा समावेश झाला तर दुकान उघडे राहण्याची वेळ पूर्वीप्रमाणे राहील तर मॉल आणि मल्टिप्लेक्स त्याचबरोबर रेस्टॉरंट हे 50 टक्के क्षमतेने सुरू होऊ शकतील. प्रायव्हेट ऑफिस देखील सुरू होऊ शकेल क्रीडा संकुल यांना ही परवानगी देण्यात येईल तर लग्नाला पन्नास टक्के लोकांना हजेरी लावता येईल. मात्र वरची टक्केवारी लक्षात घेता तिसर्या गटात समावेश झाला तर मात्र चार वाजेपर्यंत दुकान उघडायला परवानगी मिळणार आहे. मॉल मल्टिप्लेक्स हे पूर्णपणे बंद राहणार आहेत तर रस्त्यावरील फक्त पन्नास टक्के क्षमतेने चार वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी मिळेल. क्रीडा संकुले आणि उद्याने ही सकाळी पाच ते नऊ दरम्यानच उघडी राहतील तर प्रायव्हेट ऑफिसेस चार वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी मिळणार आहे यामध्येसुद्धा 50 टक्के क्षमतेने ते ऑफीस सुरू ठेवावे लागतील. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी ना ते नऊ सकाळी आणि सहा ते नऊ संध्याकाळी या दरम्यानच आणि तेही खुल्या वातावरणातल्या किल्ला प्रकारांना परवानगी मिळणार आहे. कोणत्याही कार्यक्रमांना फक्त पन्नास टक्के क्षमतेने लोकांना हजेरी लावावी लागणार आहे आणि तेही चार वाजेच्या आत आयोजित करावे लागतील. लग्नाला देखील 50 लोकांनाच परवानगी असेल तर अंत्यसंस्काराला फक्त 20 लोकांना परवानगी राहील. महापालिकेतील सर्वसाधारण सभा या मात्र 50 टक्के क्षमतेने घेता येतील. बांधकामावर तीसुद्धा चार वाजेपर्यंत जायला परवानगी मिळेल. शहरात पाच वाजेपर्यंत जमावबंदी असेल तर त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात येईल. सलून जिम ब्युटी पार्लर हे चार वाजेपर्यंत 50% क्षमतेने आणि फक्त अपॉइंटमेंट घेऊनच सुरू राहतील. जिल्ह्याबाहेर पवार प्रवासाला परवानगी राहील.
पुणे महापालिका आज यासंदर्भात नियमावली जाहीर करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीमध्ये ही नियमावली सोमवार पासून लागू करण्यात येईल अशी माहितीही दिली आहे. आता पुणेकरांचा आयुष्य पूर्ववत होतं का वरचे पॉईंट 0.16% हे त्याच्या आड येतात हे पहावे लागेल.