वालचंदनगर - जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखीमार्ग रस्तारुंदीकरणाच्या कामाला काही महिन्यांत सुरुवात होणार आहे. पालखीमार्ग चौपदरी मंजूर असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बारामती ते इंदापूर रस्त्यावर अनेक जातींची नानाविध गर्द हिरवीगार लाखो मोठमोठी झाडे असून, ती आगामी काळात राहतील की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. रस्तारुंदीकरणाच्या प्रकल्पामुळे या डेरेदार आणि जुन्या वृक्षांवर कुºहाड कोसळणार आहे.जाणाऱ्या-येणाºया प्रवाशांना थंडगार सावलीला मुकावे लागणार आहे. तर, ओसाड माळरानाचे स्वरूप या रस्त्याला येणार आहे. देहू-आळंदीपासून इंदापूर तालुक्याच्या मार्गावर होणाºया रस्त्याच्या अडथळ्यामुळे शासनाने हा रस्ता चौपदरी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे. रस्त्याची पाहणी करून जागोजागी लाल रंगाच्या खुणा करण्यात आल्या आहेत. यात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकºयांना जबरदस्त फटका बसणार असून, जवळजवळ १० ते २० फूट शेतीतून हा रस्ता जाणार असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाºया शेतकºयांनी धास्ती घेतली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला असंख्य गावे आहेत. त्यात गोरगरीब, अल्पसंख्याक, मागासलेले, भटक्या जमातीच्या लोकांच्या घरांवर वरवंटा फिरणार आहे. या लोकांच्या घराची राहण्याची सुविधा करणे तितकेच गरजेचे आहे. शेतकºयांना जमिनीचा योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेकडो वर्षापूर्वी रस्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेले वृक्ष असल्याने त्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे. काही महिन्यांत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे चावडीवर गावागावांत चर्चा रंगताना दिसत आहे.पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पाठीमागे रस्ता चौपदरी करण्यास सुरुवात होणार असल्याने हे बारामती-इंदापूर रस्त्याच्या कडेला असलेले वृक्ष काही दिवसांपुरतेच आपल्यासोबत असल्याचे जाणाºया-येणाºया प्रवाशांतून बोलले जात आहे.या झाडाच्या दोन्ही बाजूंना रस्ता तयार करून वृक्ष मध्यभागी ठेवल्यास लाखो झाडांना जीवदान मिळणार असल्याचे जाणकार सांगतात अथवा झाडाची प्लांट करून लावल्यास असंख्य झाडे वाचतील.
पालखीमार्ग रस्तारुंदीकरण : झाडांची होणार कत्तल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:18 AM