वेल्हे तालुक्यातील विंझर ते कात्रज पीएमपीएलच्या बससेवेस नुकतीस सुरुवात करण्यात
आली.या बससेवेचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे व पुणे महानगरपालिकेच्या
नगरसेविका राणी भोसले, माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पीएमपीएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, पीएमपीएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कात्रज आगाराचे प्रमुख दत्तात्रय रांजणे, सभापती दिनकर सरपाले,
जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, उपसभापती आनंता दारवटकर, माजी उपसभापती डॅा.संभाजी मांगडे, कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर,
उपाध्यक्ष गणेश जागडे,नाना राऊत,मार्गासनीच्या सरपंच मनिषा काटकर,विंझरचे सरपंच विनायक लिम्हण, उपसरपंच राहुल सागर, माजी सरपंच संभाजी भोसले
सतीश लिम्हण,शिवाजी चोरघे,विशाल वालगुडे,संतोष लिम्हण आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वेल्हे तालुका हा निसर्गाने नटलेला आहे. किल्ले राजगड किल्ले तोरणागड,मढेघाट या परिसरात पर्यटनासाठी पर्यटक येत असतात. तसेच पुणे शहरापासून ५० किलोमीटर अंतर असल्याने दररोज विद्यार्थी व कामगार प्रवास करीत आहेत.गेले अनेक वर्षे एसटी सेवा देत होती, परंतु दिवसेंदिवस एसटीची सेवा अपुरी पडत चालली आहे.वेल्हे तालुक्यातील ५४ गावे पीएमआरडीच्या हद्दीत येत असल्याने पीएमपीएलच्या बससेवेची मागणी होत होती.
पुणे शहरात वास्तव्य असलेले वेल्हे तालुक्यातील ग्रामस्थ वेळोवेळी प्रयत्न करीत होते.तसेच मार्गासनीच्या गावच्या रहिवाशी असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या
नगरसेविका राणी भोसले व आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठपुराव्यामुळे आज दि. २० जून रोजी बससेवा सुरू करण्यात आली.
- १) वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी असून पीएमपीएल बससेवेचा स्थानिकांना लाभ होणार आहे.पुढे बससेवा पासली व वेल्ह्यापर्यंत मिळावी अशी मागणी आहे. ------ आमदार संग्राम थोपटे
२) विंझर ते कात्रज बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व कामगार,इतर प्रवाशी यांची सोय होणार असून तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल
असणार आहे. ------ विनायक लिम्हण, सरपंच विंझर
३) पुणे महानगरपालिकेत काम करत असताना आपल्या मूळगावी महानगरपालिकेच्या माध्यमातून वेल्हे तालुक्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा
होती ती आज बससेवेच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे ----- राणी भोसले, नगरसेविका, पुणे महानगरपालिका
विंझर (ता.वेल्हे) पीएमपीएलच्या बससेवेला सुरुवात करताना आमदार संग्राम थोपटे, नगरसेविका राणी भोसले,पीएमपीएलचे अध्य़क्ष राजेंद्र जगताप, संतोष दसवडकर व इतर.