Pune Crime| आळंदीत कीर्तन ऐकायला गेलेल्या महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 10:29 AM2022-09-26T10:29:06+5:302022-09-26T10:31:22+5:30
आरोपीविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे...
आळंदी : परवानगी न घेता तू इथे कीर्तन ऐकायला कशी काय आलीस, म्हणत महिलेला अपशब्द वापरत तिचा विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) रात्री साडेदहाच्या सुमारास धोंडोपंत धर्मशाळेत घडली आहे.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात ४४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून नवनाथ कोरके (रा. धोंडोपंत धर्मशाळा, मरकळ रोड, आळंदी) याच्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या धर्मशाळेत कीर्तन ऐकण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांना तू परवानगी न घेता इथे का आलीस म्हणत शिवीगाळ व अपशब्द वापरून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच तू परत इथे आलीस तर चारशे मुले आणून तुला ठार मारीन अशी धमकी दिली. यावरून आळंदीत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.