महिला स्वयंरोजगारातून स्वावलंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:16+5:302021-03-17T04:10:16+5:30

जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या संकल्पनेतून महीलाना स्वयरोजगार करून विविध प्रशिक्षण घेऊन नवनवीन उपक्रम राबवुन महीलाना स्वताच्या पायावर ...

Women self-employed | महिला स्वयंरोजगारातून स्वावलंबी

महिला स्वयंरोजगारातून स्वावलंबी

Next

जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या संकल्पनेतून महीलाना स्वयरोजगार करून विविध प्रशिक्षण घेऊन नवनवीन उपक्रम राबवुन महीलाना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंरोजगारातून तयार झालेल्या विविध वस्तूंची विक्रीची व्यवस्थाही करण्यात आल्याने महीलाना हमखास उत्पन्न मिळवुन स्वावलभी बनवून संसाराला हातभार लागणार आहे . कोरोना काळामध्ये महिलांना ऑनलाइन एक्ससाइज पार्लर क्लासेस, मेकअप आर्टिस्ट इत्यादी प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मदत केली जात आहे. महिला बचतगट जनसंपर्क कार्यालय हे महिलांचे एकमेव हक्काचे ठिकाण झाले असून जेथे महिलांना स्वयंरोजगाराविषयी योग्य मार्गदर्शन तसेच योग्य करिअर विषयक सल्ला, समुपदेशनासह मदत केली जात आहे. ज्ञानेश्वर आबा कटके यांनी महिला बचतगट जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करून गेल्या 5 ते 6 वर्षांपासून महिलांना स्वावलंबी केले आहे.

Web Title: Women self-employed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.