शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे काम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:11 AM2021-03-01T04:11:27+5:302021-03-01T04:11:27+5:30
तळेगाव ढमढेरे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १९७८ पासून मी पतसंस्थेचा कारभार जवळून पाहत असून संस्थेने ...
तळेगाव ढमढेरे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. १९७८ पासून मी पतसंस्थेचा कारभार जवळून पाहत असून संस्थेने नेत्रदीपक प्रगती केल्याचे माजी आमदार काकासाहेब पलांडे म्हणाले.
या वेळी सभापती संतोष शेळके यांनी सर्वांचे स्वागत केले. संस्थेचे १५२७ सभासद असून संस्थेने ११.५० टक्के दराने लाभांश वाटप केला आहे. संस्थेचा कर्जाचा व्याजदर ८.९० टक्के असून ठेवीला ८.७५ टक्के दर दिला आहे. यावेळी शहाजी पवार, शिवाजीराव वाळके, नाथू वीर, भाऊसाहेब दुर्गे, सतीश नागवडे, शंकर शिंदे, संतोष विधाटे, बाळासाहेब खामकर, उत्तमराव भंडारे, कल्याण कोकाटे, प्रदीप गव्हाणे, निलेश गायकवाड, संध्या धुमाळ,संभाजी फराटे,शांताराम पोकळे, त्रिंबक भाकरे, रामदास कौठाळे, नरहरी नरवडे, विजय बेंडभर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पलांडे यांनी केले, तर आभार संजय तळोले यांनी मानले.
२८ तळेगाव ढमढेरे
प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या ३५ लाखांच्या पहिल्या धनादेशाचे वाटप करताना माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे व उपस्थित पदाधिकारी.