पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेतर्फे तब्बल ३ हजार युवकांचे ढोलवादन व ३ हजार विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती तयार करून घेणे हे दोन जागतिक विक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे अधिकृत नोंदणी करण्यात येणार आहे. महिनाभर चालणाºया विविध कार्यक्रमांचे उद््घाटन शनिवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारवाडा येथे होणार आहे. उत्सवाचा शुभंकर, विशेष गीत, खास उत्सवासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ व स्वतंत्र ध्वजपताका याचेही या वेळी त्यांच्या हस्ते प्रकाशन होईल.महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या वेळी उपस्थित होते. उत्सवाचा सदिच्छा दूत म्हणून प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी बोलणे सुरू असून, येत्या काही दिवसांतच त्याबाबत अंतिमनिर्णय होईल, असे भिमाले यांनी सांगितले.त्यासाठी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे अधिकृत नोंदणी करण्यात आली असून, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ढोलवादन स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर २३ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता होईल. शाडूमातीची गणेशमूर्ती तयार करण्याचा विक्रम बाबूराव सणस मैदानावर २३ आॅगस्टला सकाळी १० वाजता होणार आहे. या दोन्ही उपक्रमांसाठी आवश्यक त्या सरकारी कार्यालयाच्या परवानग्या घेण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली.युवकांची व विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्यात येत असून, संख्या पूर्ण होण्यात काहीही अडचण येणार नाही, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.संपूर्ण शहरातून २० आॅगस्टला दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता महापालिका भवनापासून ही रॅली सुरू होईल. कोणीही पुणेकर यात सहभागी होऊ शकतो. पारंपरिक वेशभूषेत सर्व स्तरांतील नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.ढोलवादनाचा विक्रम २३ आॅगस्टला स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता होईल. २४ आॅगस्टला ३ हजार विद्यार्थ्यांकडून शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करून घेण्यात येणार आहे.बाबूराव सणस मैदानात सकाळी १० वाजता या उपक्रमाची सुरुवात होईल. महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांमधीलहीविद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात येत आहे असे महापौरांनी सांगितले.खड्डेविरहित मंडप हे पालिकेचे धोरण1 खड्डेविरहित मंडप हे महापालिकेचे धोरणच आहे. त्याची अंमलबजावणी केली जाईल. यासंबधीच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून कायदेशीर कारवाईही केली जाईल, असे या वेळी अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. सर्वच मंडळांनी नियमाचे पालन करून मंडप टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.वॉल पेटिंग, प्रसिद्ध कलावंतांची रॅली, सोसायट्यांसाठी सजावट स्पर्धा असे अन्य अनेक उपक्रम घेण्यात येणार आहेत. २ कोटी रुपयांची विशेष तरतूद यासाठी करण्यात आली आहे. त्यातच सर्व खर्च बसवण्यात येत आहे. मात्र जास्त पैसे लागले तरी अनेकांनी प्रायोजकत्व घेण्याची तयारी दर्शवली आहे. मंडळांनाही यात सहभागी करून घेण्यात येत आहेत अशी माहिती महापौरांनी दिली.2 खड्डेविरहित मंडप हे महापालिकेचे धोरणच आहे. त्याची अंमलबजावणी केली जाईल. यासंबंधीच्या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले म्हणून कायदेशीर कारवाईही केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. सर्वच मंडळांनी नियमाचे पालन करून मंडप टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.
ढोलवादनाचा जागतिक विक्रम, गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 3:19 AM