लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विमेन स्पोर्टस असोसिएशन संघाने (डब्ल्यूएसए) तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय निमंत्रित महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत एच. के. बाउन्स संघावर ९ विकेटनी मात केली. दुसरीकडे पुणे फाल्कन्स व कर्नाटका स्पोटर््स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आझम स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने व्ही. एम. गानी स्पोटर््स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या लढतीत बाउन्स संघाची कॅप्टन सई पुरंदरेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सई आणि सायली लोणकर यांनी संयमी सुरुवात केली. या जोडीने ८.१ षटकांत ३१ धावांची सलामी दिली. सई आणि सायली बाद झाल्यानंतर इतरांना फटकेबाजी करता आली नाही. चहिताली बी.ने २६ धावा जोडल्या. बाउन्स संघाला निर्धारित २० षटकांत ६ बाद ७९ धावाच फलकावर लावता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना डब्लूएसएची कॅप्टन मुक्ता मगरेने आक्रमक सुरुवात केली. तिने तीन सुरेख चौकार लगावले. मात्र, अनुभवी मुक्ताला मोठी खेळी करता आली नाही. यानंतर प्रियांका घोडके आणि चार्मी गवई यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची अभेद्य भागीदारी करून डब्लूएसए संघाला १२.५ षटकांतच विजय मिळवून दिला. संक्षिप्त धावफलक : एच. के. बाउन्स - २० षटकांत ६ बाद ७९ (सायली लोणकर २६, चहिताली बी. २६, सई पुरंदरे १६, मुक्ता मगरे ३.५-०-१३-२, निकिता आगे ४-०-१३-१, सायली अभ्यंकर २-०-१०-१) पराभूत वि. डब्ल्यूएसए- १२.५ षटकांत १ बाद ८३ (प्रियांका घोडके नाबाद ३९, चार्मी गवई नाबाद २६, मुक्ता मगरे १२, सोनिया डबिर ३.५-०-३७-१); पुणे फाल्कन्स - २० षटकांत ५ बाद १५९ (मानसी पटवर्धन नाबाद ३७, केतकी खांडेकर २८, पूनम जगताप २०, पूनम खेमनार २०, धनश्री पाकधने २-०-१७-२, गायत्री पाटील ४-०-२३-१, स्नेहल थोरात ४-०-२९-१) वि. वि. प्रवरा जेम्स-२० षटकांत ८ बाद ५३ (युगंधरा सप्रे १५, नीलम पाटील ४-१-६-३, वैष्णवी काळे ३-१-१०-२, मानसी पटवर्धन ४-१-५-१); आझम स्पोर्टस अॅकॅडमी - १९.१ षटकांत सर्वबाद ४३ (संजना शिंदे १८, सिमरन हेन्री ३.१-०-६-३, प्रतुषा ४-०-१२-३, श्रेयांका ४-१-६-२, वंदना महाजन ४-२-५-१) पराभूत वि. कर्नाटका स्पोर्टस - ५.१ षटकांत ४ बाद ४४ (आदिती नाबाद १४, सिमरन हेन्री नाबाद ८, ऋचिता परदेशी १.५-०-२०-१, फरहाना शेख २.१-०-१६-१, उत्कर्षा देशपांडे १-०-८-१).
डब्ल्यूएसए, पुणे फाल्कन्स, कर्नाटका स्पोटर््स संघ विजयी
By admin | Published: May 10, 2017 4:19 AM