येनकर यांनी प्रथमच सुनावली फाशीची शिक्षा
By admin | Published: May 10, 2017 04:18 AM2017-05-10T04:18:10+5:302017-05-10T04:18:10+5:30
विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांच्यापुढे नयना पुजारी खून खटल्याचे कामकाज गेली २ वर्षे सुरू होते. त्यांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांच्यापुढे नयना पुजारी खून खटल्याचे कामकाज गेली २ वर्षे सुरू होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा मंगळवारी प्रथमच ठोठावली. या निकालामुळे महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात समाजात चांगला संदेश जाईल, असा विश्वास त्यांनी निकाल देताना व्यक्त के ला.
अतिशय संयमितपणे गेल्या २ दिवसांपासून आरोपींना दोषी ठरविण्याचे आणि फाशीची शिक्षा सुनावण्याचे काम त्यांनी पार पाडले. न्यायालयात होणाऱ्या गर्दीचा, आवाजांचा परिणाम स्वत:च्या संयत आणि शांतपणावर होऊ न देता त्यांनी न्यायाधीश म्हणून प्रक्रियेनुसार सर्व कामकाज पार पाडले. आज सकाळी न्यायाधीश न्यायासनावर स्थानापन्न झाल्यानंतर विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांचा सुमारे दीड तास युक्तिवाद झाला. त्यानंतर बचाव पक्षाचे वकील बी. ए. आलूर यांचा सुमारे सव्वातीन तास युक्तिवाद झाला. अतिशय शांतपणे हे दीर्घ युक्तिवाद ऐकत त्या काही निरीक्षणे नोंदवीत होत्या.
विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आरोपींना प्रथमच फाशीची शिक्षा सुनावल्याच्या माहितीला हर्षद निंबाळकर यांनी दुजोरा दिला.