दिवाळीत यंदा अावाज कमी किंमत जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 08:04 PM2018-11-03T20:04:22+5:302018-11-03T20:05:39+5:30

सध्या शहरातील विविध भागांमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी हाेत अाहे. यंदा मात्र जास्त अावज करणाऱ्या फटाक्यांपेक्षा शाेभेचे फटाके माेठ्याप्रमाणावर बाजारात दाखल झाले अाहेत.

this year prise of fire crackeri is high | दिवाळीत यंदा अावाज कमी किंमत जास्त

दिवाळीत यंदा अावाज कमी किंमत जास्त

googlenewsNext

पुणे : सर्वाेच्च न्यायालयाने फटाके उडवण्यासाठीच्या वेळेमध्ये बंधने अाणली असली तरी फटाके उडविण्याचा नागरिकांचा उत्साह कुठेही कमी झाला नाही. सध्या शहरातील विविध भागांमध्ये फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी हाेत अाहे. यंदा मात्र जास्त अावज करणाऱ्या फटाक्यांपेक्षा शाेभेचे फटाके माेठ्याप्रमाणावर बाजारात दाखल झाले अाहेत. असे असले तरी या फटक्यांची किंमत अधीक असून त्यात जीएसटी सुद्धा अाकारला जात असल्याने फटाक्याच्या किंमती यंदा कमालीच्या वाढल्या अाहेत. 

    नदी पात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांचे माेठ्याप्रमाणावर स्टाॅल लावण्यात अाले अाहेत. या स्टाॅल्समध्ये 250 रुपयांपासून ते दीड - दाेन हजारांपर्यंतचे फटाके विक्रीस उपलब्ध अाहेत. यात अावाज करणाऱ्या फटाक्यांचे प्रमाण कमी असून शाेभेच्या फटाक्यांची संख्या अधिक अाहे. त्याचबराेबर चित्रपट कलाकारांच्या नावांचे तसेच त्यांचे फाेटाे असलेले फटाके सुद्धा नागरिकांचे लक्ष वेधून घेत अाहेत. यात कतरीना कैफ, करीना कपूर यांच्याबराेबरच बाहुबली फटाका सुद्धा विक्रीस ठेवण्यात अाला अाहे. अाकाशात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांना यंदा विशेष मागणी अाहे. 

    फटका विक्रेते हर्षल भाेकरे म्हणाले, यंदा फटाक्यांच्या किंमती कमालीच्या वाढल्या अाहेत. त्यातच जीएसटी सुद्धा अाकारला जात असल्याने जादा किंमत नागरिकांना माेजावी लागत अाहे. तसेच यंदा माेठा अावाज करणाऱ्या फटक्यांपेक्षा शाेभेचे अनेक फटाके दाखल झाले अाहेत. ग्राहकांकडूनही शाेभेच्याच फटाक्यांना मागणी अाहे. परंतु दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाके घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी झाली अाहे. 

Web Title: this year prise of fire crackeri is high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.