स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:39 PM2018-03-03T17:39:29+5:302018-03-03T17:39:29+5:30

 वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.मुळीक यांच्या निवडीमुळे पुण्यावर पालकमंत्री गिरीश बापट यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Yogesh Mulik is elected as the Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक  

स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक  

googlenewsNext
ठळक मुद्देअध्यक्षपदासाठी भाजपमध्ये सुनील कांबळे, रंजना टिळेकर यांची नावे देखील चर्चेत

पुणे :  वडगाव शेरीचे आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीवेळी झालेला गोंधळ लक्षात घेता यावेळी थेट मंत्री महादेव जानकर स्वत: चिठ्ठी घेऊन आले. योगेश मुळीक यांची नगरसेवकपदाची ही दुसरी वेळ आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते लक्षात घेत वडगावशेरी भागात पक्षाला ताकद देण्यासाठी मुळीक यांच्या नावाचा विचार पक्षाने केला असावा असे बोलले जात आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये  राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे, भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर यांची नावे देखील होती. तसेच स्थायी समितीच्या सदस्या मंजुषा नागपूरे यांनी देखील अध्यक्षपदासाठी उत्सुकता दाखविली होती. मात्र , योगेश मुळीक यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांची निवड निश्चित असल्याचे मानले जात आहे. ही निवडणुक ७ मार्च ला होणार आहे. पुणे महानगर पालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने स्थायी अध्यक्षपदाची निवडणुक फक्त  नाममात्र राहणार आहे. परंतु,  या निवडणुकीत पुण्यातील तीन आमदारांनी  घरात अध्यक्षपद मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. त्यात  योगेश मुळीक यांची सरशी झाली. त्यामुळे मुळीक यांच्या निवडीमुळे पुण्यावर पालकमंत्री गिरीश बापट यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Web Title: Yogesh Mulik is elected as the Standing Committee Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.