हे फक्त 'पुण्यात'च घडू शकतं! ढिम्म प्रशासनाला सुद्धा या 'हटके' आंदोलनाची दखल घ्यावीच लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 04:04 PM2020-09-18T16:04:05+5:302020-09-18T16:41:48+5:30

सुस्त व ढिम्म प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलने करण्यात येत असतात.

You have never seen such a 'Hatke' movement! The administration will have to take 'lazy' | हे फक्त 'पुण्यात'च घडू शकतं! ढिम्म प्रशासनाला सुद्धा या 'हटके' आंदोलनाची दखल घ्यावीच लागणार

हे फक्त 'पुण्यात'च घडू शकतं! ढिम्म प्रशासनाला सुद्धा या 'हटके' आंदोलनाची दखल घ्यावीच लागणार

Next

विलास शेटे-

मंचर: कुणी संबळ तर कुणी घंटा वाजवून, कुणी खड्ड्यातील पाण्यात कागदी होड्या सोडून तर अजून कुणी काय काय. प्रशासन, सरकार यांना जाग आणण्यासाठी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिक आंदोलने करण्यासाठी रस्त्यावर उतरतो.पण हे रस्ते सुरक्षित व व्यवस्थित आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था आहे.यामुळे अनेक अपघात होतात  . त्यात कित्येकांना यात आपला जीव देखील गमवावा लागतो. तरीदेखील प्रशासन मात्र ढिम्म अवस्थेत असते. मंचर- रांजणी राज्य मार्ग असून तो पुणे-मंचर मार्गे बेल्हे, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांना जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर असलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे प्रवासी व नागरिक त्रस्त आहे. मात्र प्रशासन काही केले याची दखल घेत नाही नव्हते. मग  सर्वपित्री अमावस्येच्या मुहूर्तावर रस्त्यावरील खड्ड्यांना रांगोळी काढून, व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पद्धतीने आंदोलन करण्यात आले.  

मंचर- रांजणी रस्त्यावरील खड्ड्यां रांगोळी काढून, खड्ड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनोखे आंदोलन आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी आज केले. आंबेगाव तालुक्यातील मंचर - रांजणी रस्त्यावरील खड्यांना सर्वपित्री अमावस्याच्या मुहूर्तावर रांगोळी काढून, पुरणपोळीचा नैवद्य दाखवून,आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी मंचर एस कॉर्नर,चांडोली खुर्द, चांडोली बू, खडकी फाटा, थोरांदळे, रांजणी इ ठिकाणी निषेध व्यक्त केला..


 यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे,संघटक सुभाष मावकर, गणेश थोरात, कैलास मावकर, प्रमिला टेमगिरे ,मंगेश टेमगिरे, दगडू लोखंडे,संदिप  वाबळे ,संतोष बांगर ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा ऊर्जा ऊर्जा समिती प्रमुख नितीन मिंडे यांच्यासह या मार्गावरील प्रत्येक गावातून उस्फूर्तपणे कोरोनाचे सर्व नियम पाळून सुमारे  50 ते 60 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. 
 

मंचर- रांजणी 112 क्र चा राज्य मार्ग असून या मार्गावरून पुणे मंचर मार्गे बेल्हे, अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांना जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. तसेच आंबेगाव तालुक्याचा व जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग मंचरकडे याच मार्गाने प्रवास करतो. यामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात. शेतमाल ,दूध याची वाहतूक होते .सुमारे एका तासाला या मार्गावरुन लहानमोठी 200 ते 400 वाहने धावत असतात. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून खड्डे बुजविण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने या मार्गावरील खड्डे त्वरित बुजावेत असे आवाहन पुणे जिल्हा ग्राहक पंचयतीचे नितीन मिंडे यांनी केले आहे. या अभिनव आंदोलनाने प्रशासनाला जाग येईल असे मिंडे म्हणाले.

Web Title: You have never seen such a 'Hatke' movement! The administration will have to take 'lazy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.