अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून लादले मातृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 08:18 PM2019-10-14T20:18:43+5:302019-10-14T20:25:07+5:30
आपण थोडया दिवसात लग्न करू असे म्हणाला व जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले.
लोणी काळभोर : लग्राचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केलेने १६ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी लग्नापूर्वीच आई झाली असून याप्रकरणी एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय काळे ( रा. वडकी, ता हवेली ) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी मुळ सातारा जिल्ह्यातील असून सध्या ती नवी मूबई येथे रहात आहे. तिने मार्च महिन्यात १० वी परीक्षेचे पेपर दिले असून सध्या ती घरीच असते. अक्षय काळे हा आत्यासोबत तिच्या मुुुळ गावी गेला होता. त्यावेळी दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघे फोनवर एकमेकांशी बोलत होते. काही कालावधीने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. शाळेला सूटटया असलेने ती आत्याकडे आली होती. एके दिवशी ती व अक्षय बनेश्वर ( ता. भोर ) येथे फिरण्यासाठी दुचाकीवर गेले. तेथून परतताना नारायणपुर ते बालाजी मंदीर दरम्यान असलेल्या एका लॉजवर तो तिला घेवून गेला. त्यावेळी आपण थोडया दिवसात लग्न करू असे म्हणाला व जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेळोवेळी हडपसर परिसरातील तिचे आत्याच्या व खराडी पूणे परिसरात मावशीचे घरी याची पुनरावृत्ती झाली.
त्यानंतर ती पुन्हा मुंबई येथे तिचे आई - वडिलांकडे गेली. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे सांगितले. लोकांमध्ये बदनामी होईल या भीतीने त्यांनी कोणास काही एक सांगितले नाही. त्यानंतर ५ आॅक्टोबर रोजी ती आत्याकडे राहण्यास आली. ११ आॅक्टोबर रोजी तिचे पोटात दुखू लागलेने हड़पसर येथील रूग्णालयात दाखल केले असता तेथे तिची नैसर्गिक प्रसूती होवून तिने एका मूलाला जन्म दिला आहे.