पुणे : पुण्याला निसर्गाचे माेठे वरदान लाभले अाहे. पुण्याच्या अाजूबाजूच्या परिसरात अनेक निसर्गरम्य ठिकाणं अाहेत. साहजिकच देशभरातील पर्यटक पुण्यातील निसर्ग पाहण्यासाठी येत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे विकेंडला दिवसा बाहेर पडणेही नकाेसे हाेते. यावरच ताेडगा काढत पुण्यातील विविध संस्था पर्यटकांसाठी नाईट कॅम्पचे अायाेजन करित असून पर्यटकांना निसर्गाचे रात्रीचे साैंदर्य दाखविण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत अाहे. याला खासकरुन तरुणांची माेठी पसंती असून शनिवार-रविवार पुण्याजवळील धरणांच्या काठी असे नाईट कॅम्प अायाेजित करण्यात येत अाहेत. कात्रज ते सिंहगड असे नाईट ट्रेकिंग पुण्यात अनेकदा केले जाते. त्याच्या स्पर्धाही भरविल्या जातात. यापुढे जात अाता नाईट कॅम्पची संकल्पना पुण्यात रुढ हाेताना दिसत अाहे. विविध संस्थांकडून नाईट कॅम्प अायाेजित केले जातात. यात एखाद्या धरणाच्या काठी, किंवा एखाद्या तलावाच्या काठी रात्रीच्या वेळी कॅम्प लावला जाताे. यात तुम्ही रात्रीच्या वेळी निसर्गाच्या अदभूत नजाऱ्यांचा अानंद घेऊ शकता. रात्रीच्या कॅम्पची तसेच खाण्याची सर्व साेय यात केली जाते. रात्रभर एखाद्या धरणाच्या किनारी कॅम्प लावल्यानंतर सकाळी जवळील एखादा किल्ला सर केला जाताे. या कॅम्पमध्ये सहभागी हाेणाऱ्यांना त्या ठिकाणची संपूर्ण माहिती सांगितली जाते. या कॅम्पमध्ये विविध गेम्सही घेतले जातात. अनेकदा लाईव्ह मॅचेसही दाखविल्या जातात. पुण्याजवळील पवना धरण, देवकुंभ, वासाेटा, भंडारदरा, भाेर येथे हे कॅम्प अायाेजित करण्यात येत अाहेत. संध्याकाळी पुण्यात सर्वजण भेटतात अाणि त्यानंतर पुढचा प्रवास एकत्र केला जाताे. या कॅम्पच्या अाधी सहभागी नागरिकांना या कॅम्पबद्दलची तसेच यातील काठिण्य पातळीची कल्पना दिली जाते. त्याचबराेबर कुठलाही अपघात हाेणार नाही याची संपूर्ण खबरदारी सुद्धा घेतली जाते. याबाबत अधिक माहिती देताना पुणे ट्रॅव्हल क्लबचे पराग असझूनपुरकर म्हणाले, नाईट कॅम्पला नागरिकांचा माेठा प्रतिसाद मिळत अाहे. खासकरुन तरण वर्गाचा या कॅम्पकडे जास्त अाेढा अाहे. मी व माझे सहकारी अाम्ही महाराष्ट्रातील तसेच पुण्यातील विविध ठिकाणं सुरुवातीला पाहून येताे. त्यानंतर पर्यटकांना त्या ठिकाणी घेऊन जाताे. नवनवीन ठिकाणं शाेधण्याचा अामचा प्रयत्न असताे. राेजच्या धकाधकीच्या जीवनातून दूर निर्सगाच्या जवळ पर्यटकांना नेण्याचा अामचा प्रयत्न असताे. वेगवेगळ्या ठिकाणांच्या प्रकारानुसार कॅम्पची पद्धत वेगवेगळी असते. त्याचबराेबर अाम्ही ट्रॅव्हल मिटअप हा कार्यक्रम अायाेजित करुन त्याद्वारे जे पर्यटक एखादे वेगळे ठिकाण बघून अालेले असतात, ते अापले अनुभव सांगतात. लहान मुलांपासून, जेष्ठांपर्यंत सर्वजण यात सहभागी हाेतात.
नाईट कॅम्पला वाढतीये पुण्यातील तरुणांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 4:12 PM
पुण्याजवळच्या निसर्गरम्य परिसरात अनेक नाईट कॅम्प अायाेजित करण्यात येत असून त्याला पर्यटकांचा माेठा प्रतिसाद मिळत अाहे.
ठळक मुद्देनाईट कॅम्पमधून नवीन ठिकाणांचा घेतला जाताे शाेधविविध ट्रेकिंग स्पर्धांचेही केले जाते अायाेजन