पुणे : 2 हजार रुपये दिले नाही म्हणून डोक्यात दगड घालून युवकाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:55 AM2018-10-29T09:55:11+5:302018-10-29T09:55:16+5:30

संगमवाडी परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बॉम्बे सॅपर्स येथील वेपन ट्रेनिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या जागेत एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली

Youth murdered over 2 thousand rupees in Pune | पुणे : 2 हजार रुपये दिले नाही म्हणून डोक्यात दगड घालून युवकाची निर्घृण हत्या

पुणे : 2 हजार रुपये दिले नाही म्हणून डोक्यात दगड घालून युवकाची निर्घृण हत्या

Next

पुणे : संगमवाडी परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बॉम्बे सॅपर्स येथील वेपन ट्रेनिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या जागेत एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. सोमवारी (29 ऑक्टोबर) ही घटना उघडकीस आली. नरसिंग कुमार गर्ग (वय 38 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानमधील रहिवासी होता. याप्रकरणी पोलिसांनी दुर्गेश गोस्वामी (वय29 वर्ष) अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग गर्ग आणि दुर्गेश गोस्वामी हे दोघेही सुतारकामाचा व्यवसाय करत होते. या सुतारकामाचे २ हजार रुपये गर्ग याने गोस्वामी याला द्यायचे होते. पण तो पैसे देत नव्हता. रविवारी गोस्वामी याने त्याच्याकडे पुन्हा पैशाची मागणी केली. तेव्हा त्याने गोस्वामीला लोहगावहून बोलावून घेतले. रात्री दोघंही दारू प्यायले. यावेळी गर्गने त्याला १ हजार रुपये दिले. त्यानंतर दोघंही घरी जात असताना संगमवाडी येथे त्यांच्यात पुन्हा पैशाने वाद झाला. गोस्वामी याने आणखी एक हजार रुपये दे, असे त्याला सांगितले. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळेस गर्ग जमिनीवर पडला. तेव्हा गोस्वामीने दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. या  घटनेत गर्गचा जागीच मृत्यू झाला.  त्याला ठार करुन गोस्वामी लोहगावला घरी पसार झाला. 

दरम्यान, संगमवाडी येथे एकाची हत्या झाल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्रे भराभर फिरवली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे गोस्वामीचं घर गाठलं.  गोस्वामीकडून पोलिसांनी गर्गचे पाकिट, मोबाइल जप्त केले आणि त्याला बेड्या ठोकल्या.

 

Web Title: Youth murdered over 2 thousand rupees in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.