युवकांनी मधूमक्षिका पालनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:57+5:302021-03-25T04:10:57+5:30
भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत नॅशनल बीकीपिंग व हॉनी मिशन माध्यमातून ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र ...
भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत नॅशनल बीकीपिंग व हॉनी मिशन माध्यमातून ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथे सात दिवसीय शास्त्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गावातील युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन आमदार अतुल बेनके यांनी केले. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे, मधुमक्षिका प्रशिक्षक महादेव गावकर, पीक संरक्षणतज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, राहुल घाडगे, भरत टेमकर, युवा प्रशिक्षणार्थी रामदास बुळे, भागुजी जोशी तसेच जळवंडी, चावंड, खैरे, उसराण, अंजनावळे, देवळे, हडसर, मांगळी, हिरडी इ. गावातील शेतकरी उपस्थित होते .
आ. बेनके म्हणाले की, ग्रामीण भागात उपलब्ध साधनसामग्रीचा उपयोग करून मधुमक्षिका पालन हा व्यवसाय ग्रामीण भागात करता येतो. शासनाच्या विविध योजनांची अबंलबजावणी करून या भागातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत .
मेहेर यांनी मधुमक्षिका पालनाचे महत्व व भविष्याची गरज यावेळी स्पष्ट करून या व्यवसायाला सुवर्ण दिवस येतील असा विश्वास दिला.
पीक शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे म्हणाले कि , परिसरामध्ये आढळणार्या मधुमक्षिका, त्यांचे प्रकार, त्यांचे मानवी जीवनातील महत्व तसेच मधुमक्षिकांचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल यासाठी शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन करावे.
या सात दिवसीय प्रशिक्षणाला २६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रशिक्षण किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घाडगे यांनी यांनी केले.
नारायणगाव येथे सात दिवसीय शास्त्रीय मधुमक्षिकापालन प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आ. अतुल बेनके.